म्हासुर्णे प्रतिनिधी : चोराडे (ता. खटाव ) येथील श्री अष्टविनायक कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
त्यामध्ये लहान व मोठया वयोगटातील स्पर्धकांच्या डान्स स्पर्धा पार पडल्या,
त्यात लहान गटामध्ये चोराडेतील प्रथम अस्मिता पिसाळ द्वितीय ललित पांडे तृतीय विभागुन काजल जानकर, शितल चव्हाण श्रावणी जानकर,मध्यम गटात प्रथम क्रमांक संस्कृती कुंभार द्वितीय प्रेरणा पिसाळ मोठया गटात पहिला क्रमांक सलोणी मुल्ला द्वितीय क्रमांक समृद्धी घुटुगडे तृतीय क्रमांक जीवन शेवाळे या स्पर्धकांना बक्षीस वाटप करताना महाराष्ट्र राज्य धनगर समाज संघर्ष समिती खटाव तालुका उपाध्यक्ष धनराज दगडे, सोसा.सचिव संजय पिसाळ, ग्रा.पं.सदस्य श्रीकांत पिसाळ, ग्रा.सदस्या साै.आराधना पिसाळ, ग्रा.पं माजी सदस्य दादासाहेब दगडे, सोसा.संचालक सुधाकर कुंभार, अभिनेते मेहबूब मुल्ला रहिम मुल्ला, सुनिल कोळी, यांची प्रमुख उपस्थिती होती.
तरी या मंडळातील कार्यकर्ते तुषार पाटील,रविराज जानकर तरुण जंगम, अभिषेक कुंभार समीर जानकर साहिल मुल्ला यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. या कार्यक्रमास गावातील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
श्री अष्टविनायक कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या डान्स स्पर्धा उत्साहात संपन्न
RELATED ARTICLES