Friday, June 20, 2025
HomeUncategorizedम्हासुर्णे येथील जगदंब ग्रुप लहान गटात प्रथम

म्हासुर्णे येथील जगदंब ग्रुप लहान गटात प्रथम

 

म्हासुर्णे (प्रतिनिधी तुषार माने) :- म्हासुर्णे ता.खटाव येथील जगदंब डान्स ग्रुप यांना सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट आयोजित सातवा जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये लहान गटात प्रथम क्रमांक मिळवला.

नुकत्याच झालेल्या सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट आयोजित सातवा जिल्हा स्तरीय युवा महोत्सवामध्ये म्हासुर्णे येथील जगदंब डान्स ग्रुपने लहान गटात प्रथम क्रमांक मिळवुन बाजी मारली.प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल जगदंब डान्स ग्रुपला सेवागिरी देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष सुरेश जाधव म्हासुर्णे गावच्या कन्या सौ.रुक्मिनी जाधव(पुसेगाव) यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.सर्व कलाकारांना अनिल जाधव यांचे प्रशिक्षक लाभले.सर्व यशस्वी कलाकारांचे म्हासुर्णे येथील शिक्षण सल्लागार मंडळाचे चेअरमन महादेव माने,सरपंच सचिन माने,ग्रामपंचायत सदस्य तुषार माने,विठ्ठल माने,प्रशिक्षक अनिल जाधव,विजय गुरव,रामचंद्र माने व म्हासुर्णे येथील सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular