Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीरणबहाद्दर दत्ताजीराव शिंदे म्हणजे महाराष्ट्राचे मुकुटमणी:पंडित करकरे

रणबहाद्दर दत्ताजीराव शिंदे म्हणजे महाराष्ट्राचे मुकुटमणी:पंडित करकरे

पुसेसावळी : देशावर चालून आलेल्या परकीय शत्रूला सामोरे जाऊन बचेंगे तो और भी लढेंगे असे वीर उदगार काढणारे रणबहाद्दर दत्ताजीराव शिंदे म्हणजे महाराष्ट्राचे मुकुटमणी होते असे गौरवउदगार मध्यप्रदेश (ग्वाल्हेर) येथील इतिहास आभ्यासक आणि लेखक पंडित निलेश करकरे यांनी शिंदेवाडी तालुका माळशिरस येथे काढले.
श्रीमंत महाराजा महादजीं शिंदे सरकार प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य आयोजित रणबहाद्दर महाराजा दत्ताजीराव शिंदे सरकार यांच्या 258 व्या स्मृतिदिन आणि महाराष्ट्रातील शिंदे सरकार बंधूंच्या स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची उपस्थिती होती तर माजी जलसंपदा मंत्री आमदार शशिकांत शिंदे हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते करकरे पुढे म्हणाले की भारताच्या इतिहासामध्ये शिंदे घराण्याचे मोठे योगदान असून दिल्लीच्या तख्तावर अधिराज्य गाजवणारे एकमेव मराठा म्हणून महादजीं शिंदे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते याच घराण्यातील जयाप्पा शिंदे जनकोजी शिंदे तुकोजी शिंदे यांनी मराठा साम्राज्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले पानिपत च्या रणसंग्रामा नंतर मात्र महादजीं शिंदे हे हिंदुस्थानातील सर्वात मोठे सत्ताधीश म्हणून नावारूपाला आले त्यांनी अनेक ठिकाणी मंदिरे घाट धर्मशाळा बांधल्या दत्ताजी शिंदे यांचे नाव मराठयांच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी कोरले आहे प्रत्यक्षात मरण समोर दिसत असतानाही शत्रूला बाणेदार पणे बचेंगे तो और भी लढेंगे असे म्हणणारा यौद्धा त्यांच्यासारखा दुसरा झालाच नाही.
यावेळी बोलताना रामराजे नाईक निंबालकर म्हणाले की उत्तर भारतातील विजयाचे खरे मानकरी हे शिंदे घराणे आहे राणोजी महा्दजी दौलतराव यांची परंपरा लोकशाही मध्ये माधवराव शिंदे आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी आजही अखंडित ठेवली आहे आजही या घराण्याला देशाच्या राजकारणात मोठी किंमत असून महाराष्ट्रातही या घराण्यावर प्रेम करणार्‍या लोकांचा मोठा समुदाय आहे कार्यक्रमात आमदार शशिकांत शिंदे बाळासाहेब सोळस्कर सुभाष शिंदे जयकुमार शिंदे रमेश शिंदे जयंत शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी दीपक शिंदे अविनाश शिंदे रणजित शिंदे सुरेशशेठ शिंदे केदार शिंदे अशोकराव शिंदे धर्मराज शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रतिष्ठाणच्या वतीने दिला जाणारा रणबहाद्दर दत्ताजीराव शिंदे सरकार शौर्य पुरस्कार यावर्षी पोलीस अधिकारी रमेश महाले यांना देण्यात आला तर शिंदे सरकार घराण्यातील विशेष कार्य करणार्या अविनाश शिंदे अजित शिंदे आर एन शिंदे उदय शिंदे दीपक शिंदे रसिका शिंदे राजाराम शिंदे शामराव शिंन्दे डॉ राजेंद्र शिंदे अमित शिंदे यांना महाराजा महादजीं शिंदे सरकार पुरस्काराने गौरवन्यात आले कार्यक्रमास महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून शिंदे सरकार बंधूंनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिंदेवाडी शिंदेनगर तामखडा आणि हनुमंतवाडी येथील शिंदे सरकार बंधूंनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजीराव शिंदे यांनी केले तर आभार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुहास शिंदे यांनी मानले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular