Saturday, April 20, 2024
Homeठळक घडामोडीश्रीमंत छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) ग्रंथालय पुरस्कारांचे शुक्रवारी वितरण

श्रीमंत छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) ग्रंथालय पुरस्कारांचे शुक्रवारी वितरण

सातारा : अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयाच्या वतीने देण्यात येणार्‍या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) स्मृतीप्रीत्यर्थ ग्रंथालय पुरस्कारांचे वितरण प्रतापसिंह महाराज जयंतीदिनी शुक्रवार, दिनांक 18 जानेवारी 2019 रोजी सायं. 6 वाजता पाठक हॉल, राजवाडा येथे होणार असून पुरस्काराचे हे तीसरे वर्ष असल्याची माहीती अश्वमेध ग्रंथालयाचे संस्थापक, माजी सभापती डॉ. रविंद्र भारती-झुटिंग यांनी दिली.
आजच्या व्हॉटस्अ‍ॅसप आणि फेसबुकच्या काळात युवक वाचनापासून दूर जात आहेत. अशा काळात वाचन संस्कृती टिकवण्याचे काम खर्‍याअर्थाने ग्रंथालये व वाचनालये करीत असतात. दरवर्षी अनेक लेखक विविध विषयांवर पुस्तके लिहीत असतात, प्रकाशित करीत असतात. अशी पुस्तके वाचकांपर्यंत पोचवण्याचे कामही ग्रंथालये करीत असतात. या ग्रंथालयांना, या वाचन संस्कृती टिकवणार्‍या चळवळीमध्ये परिश्रम करणार्‍याना प्रोत्साहन मिळावे, म्हणून अश्वमेध ग्रंथालयाच्या वतीने साहित्य क्षेत्रासाठी भरीव असे कार्य करणार्‍या श्रीमंत छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) यांचे नावे दरवर्षी उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार, उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार, उत्कृष्ट ग्रंथालय कर्मचारी पुरस्कार तसेच उत्कृष्ट ग्रंथ वाचक पुरस्कार देवून गौरविण्यात येते. या वर्षीच्या पुरस्करांसाठी पुरस्कार निवड समितीने श्रीमंत छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार विद्यावर्धिनी सार्वजनिक ग्रामवाचनालय, जकातवाडी सातारा यांना, श्रीमंत छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार सौ. नंदाताई जाधव, सातारा यांना, श्रीमंत छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) उत्कृष्ट ग्रंथालय कर्मचारी पुरस्कार संजय इंगवले, पाटण यांना तर श्रीमत छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) उत्कृष्ट ग्रंथ वाचक पुरस्कार प्रसिध्द व्याख्याते प्रा. श्रीधर साळुंखे, सातारा यांना जाहिर केले असून या पुरस्कारांचे वितरण जिल्हा महिती अधिकारी युवराज पाटील यांच्या हस्ते, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमीत सोनवणे यांचे प्रमुख उपस्थित होणार आहे. तरी कार्यक्रमास ग्रंथप्रेमी, ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व नागरीकांनी उपस्थित रहावे, असे अवाहन ग्रंथालयाचे अध्यक्ष शशीभूषण जाधव, कार्याध्यक्ष साहित्यिक डॉ. राजेंद्र माने यांनी केले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular