डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या आंतरशालेय क्रिडा स्पर्धांना मोठ्या उत्साहात प्रारंभ

साताराः सातारा येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शेंदूरे दातार इंग्लिश मिडीयत स्कुलच्या कोटेश्‍वर मैेदानावर आज डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या आंतर शालेय क्रिडा स्पर्धांचा प्रारंभ मोठ्या उत्साहात आणी शेकडो शालेय खेळाडूंच्या उपस्थितीत संपन्न झाला. या समारंभाचे प्रमुख पाहूणे म्हणून आंतरराष्ट्रीय कब्बडी पंच सायराबानू शेख या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या तसेच याप्रसंगी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के, डे. ए. सोसायटीचे शालेय समिती सदस्य अनंतराव जोशी,अमित कुलकर्णी,न्यु इंग्लिश स्कुलच्या शालाप्रमुख सौ.स्नेहल कुलकर्णी,उपशालाप्रमुख डी.एस. कांबळे संस्थेचे आजीवन सदस्य नागेश मोने, पुणे येथील आभा तेलंग आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
कोटेश्‍वर मैदानावर मोठ्या उत्साहात या क्रीडा स्पर्धंाचे उद्घाटन मान्यवरांचे हस्ते हवेत फुगे व शाळेचा फलक सोडून झाला.तसेच क्रीडा ज्योतीचे स्वागतही पाहुण्यांनी केले. याप्रसंगी अतिशय शिस्तबध्द असे शालेय आर्मी ट्रुपचे संचलन व मान्यवरांना दिलेली मानवंदना अतिशय सुरेखपणे सादर झाली.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्याचा सत्कार शालाप्रमुख सौ.शबनम तरडे,अमित कुलकर्णी यांनी शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देवून केला.यावेळी आपल्या प्रास्ताविकात अमित कुलकर्णी यांनी आपल्या संस्थेच्या अनेक शाळेतून अनेक गुणवान खेळाडू निर्माण होत आहेत. सध्याच्या शालेय जीवनात खेळाला विशेष महत्व असून ही स्पर्धा प्रथमच सातरा येथे भरवत आहे याचा विशेष आनंद होत आहे. आपण सर्वांनी या स्पर्धेत आपली चांगली कामगिरी करावी त्यासाठी आपणा सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो.
कार्यक्रमात सुधाकर गुरव यांनी पाहुण्याचा परिचय करुन दिला. उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुण्या आंतरराष्ट्रीय कब्बडी पंच सायराबानु शेख म्हणाल्या की,संस्थेच्या याउपक्रमाचे मी स्वागत करते, मात्र संस्थेने येथ क्रिडा मार्गदर्शन केंद्र निर्माण करावे की ज्यातून भविष्यात नामांकित खेळाडू देशस्तरावर व परदेशातही आपले खेळ सादर करुन नाव मिळवतील.
अशोक शिर्के यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देताना हार जीत बाजूला ठेउन खेळाने मानसिक आरोग्य चांगले सुधारते यासाठी अभ्यासाबरोबरच खेळही सतत खेळा व आपले शरीर तंदुरुस्त बनवा असा संदेश दिला.
अनंतराव जोशी यांनी खेळ संस्कृती निर्माण होण्यास संस्था विशेष प्रयत्न करत आहे. या मैंदानावर या शाळेची 581 मुले मुली दररोज 1 तास मैदानात खेळ खेळतात ही खेळसंस्कृति वाढीला लागावी यासाठी संस्थेने आयोजीत केलेली ही पहिली स्पर्धा आहे त्याला माझ्या शुभेच्छा देतो.
या स्पर्धेत कब्बडी व खो खो चे सामने संपन्न होत असून या स्पर्धेत संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुल, द्रविड हायस्कूल वाई, रमणबाग पुणे,एच.ए.स्कूल पिंपरी चिंचवड,टिळक रोड,अहिल्यादेवी हायस्कूल ,गरवारे आदी शाळांचे 12 मुले व मुलींचे संघ सहभागी झाले असून चार मेैदानावर या स्पर्धा संपन्न होत आहेत. समारंभात सर्व उपस्थित खेळाडूंना क्रिडा शपथ कैलास बागल यांनी दिली तसेच आभार प्रदर्शन सौ.शबनम तरडे यांनी केले. समरंभाचे सूत्रसंचालन प्रियंाका सकुंडे यांनी केले. या कार्यक्रमास पर्यवेक्षक दिलीप रावडे,सौ. सुजाता पाटील,संदिप माळी सौ. सीमा जोशी यांचेसह विवध शाळांचे प्रशिक्षक,संघ व्यवस्थापक,क्रिडा अधिकारी,क्रिडा शिक्षक,विविध शाळेचे शिक्षक,पालक यांची मोठी उपस्थिती होती.