मराठी विश्‍वकोशानी निर्मिलेल्या डीजिटल खडांमुळे मराठी वाड्:मय सर्वांसाठी सुलभ: अरूणा ढेरे

वाईः सास्कृतिक, साहित्य क्षेत्रात वाईनगरीचे योगदान मोठे आहे. त. ल. जोशी हे 34 वर्ष मराठी विश्‍वकोशामध्ये खंडनिर्मितीमध्ये योगदान दिले. मराठी विश्‍वकोशातील मराठी भाषा समृध्दीसाठी खंडनिर्मितीचे यज्ञ 1906 साली श्रीधर केतकरांनी 23 खंड निर्माण केले. व त्यांच्या प्रचार, प्रसारासाठी घरोघरी फिरून खडांचा प्रसार केला. मराठी भाषा समृध्द करण्यासाठी महत्वाचे आहे. आतापर्यंत 20 खंड तयार झाले असून कुमार विश्‍वकोश खंडनिर्मिती मराठी विश्‍वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केलेली मराठी विश्‍वकोशानी निर्मिलेल्या डीजिटल खडांमुळे मराठी वाड्:मय सर्वांसाठी सुलभ झाल्याचे उदगार 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरूणा ढेरे वाई येथे त्रिवेणी साहित्य संगमाच्या उदघाटन प्रसंगी बोलताना काढले. याप्रसंगी वाईच्या नगराध्यक्ष डॉ. प्रतिभा शिंदे, जिल्हाशिक्षणाधिकारी राजे. क्षीरसागर, तहसिलदार रमेश शेंडगे, वाई अर्बंन बॅकेचे अध्यक्ष सी.व्ही. काळे, उपाध्यक्ष राजेंद्र चावलाणी, अभिनेते राहूल सोलापुरकर, विश्‍वकोश निर्मिती मराठी विश्‍वकोश मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर, सचिव शामकांत देवरे, सहसचिव अर्पणा गावडे, निवेदक सुधीर गाडगीळ, यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला ग्रंथदिंडीचेआयोजन करण्यात आले होते. तसेच त्रिवणी साहित्य संगमातील पु.ल. देशपांडे, ग.दी. माडगुळकर व सुधीर फडके यांच्या प्रतिमांचे पुजन व दिप प्रज्वलन करण्यात येवून सूरूवात करण्यात आली. तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मराठी विश्‍वकोश सूचीखंड प्रकाशन, ज्ञानमंडळ संकेतस्थळ आणि कुमार विश्‍वकोश खंडाचे लोकार्पण करण्यात आले. तसेच मराठी विश्‍वकोशाच्या वतीने उपस्थित प्रमुखांचे साहित्य संमेलनस्थळी स्वागत करण्यात आले.
डॉ अरूणा ढेरे म्हणाल्या पु.ल. देशपांडे, ग. दी. माडगुळकर व सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त या त्रिवेणी साहित्य संगमाचे आयोजन कृष्णातीरी करण्यात आले आहे. हा दुग्ध शर्करा योग असून मराठी साहित्य रसिकांसाठीही एक पर्वणी आहे. या तिन्ही दिग्गजांनी मराठी साहित्याबरोबर चित्रपट सृष्टीत मोलाचे योंगदान दिले असून तिघांनीही विविध क्षेत्रात एकत्र काळ गाजविला आहे. पु.ल. हे विनोदी व वात्रट साहित्यीक लेखक, ग.दी. माडगुळकर हे भावविश्‍वावर काव्य निर्मिती करणारे शिग्रकवी तसेच अभिनेते पटकथाकार होते. तर बाबूजी सुधीर फडके महान संगीतकार व गायक होते. या तिघांचेही मराठी काव्य क्षेत्रात मोलाचे योगदान होते. यावेळी वाईच्या नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे,मनोगत व्यक्त केले.
उघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांनी करून देत मराठी विश्‍वकोशाला विस खंड व कुमार विश्‍वकोश निर्मिती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचे विशद केले. खंडाचा परिचय सरोजकुमार मिठारी यांनी करून दिला.
उदघाटन कार्यक्रमानतंर सकाळी अकरा वाजता ग.दी. माडगूळकर यांची प्रतिभा सृष्टीवर चर्चासत्र झाले यामध्ये सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ, सहभाग चित्रपट दिग्दर्शक राजदत्त, साहित्यिक विनया बापट, सिसिलिया कार्व्हालो यांनी सहभाग घेतला. तर दुपारी तीन वाजता बहरगीतांचा व कवितांचा या कार्यक्रमात कवी अरूण म्हात्रे, अशोक नायगांवकर, यांनी विनोदी कविता, किस्से व गायनानी श्रोत्यांमध्ये नवचैतन्य भरले.