महाबळेश्वर : विशेष पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या संकल्पनेतुन डायरेक्टर जनरल युथ पार्लमेंट चॅम्पियनशीप स्पर्धा नुकतीच महाबळेश्वर येथे पार पडली. या स्पर्धेत सेठ गंगाधार माखरीया हायस्कुलच्या विद्यार्थ्यांचा गट विजेता ठरला तर गिरीस्थान हायस्कुलचे विदयार्थी उपविजेते ठरले उपनगराध्यक्ष अफजल सुतार अर्बन बॅकेचे अध्यक्ष राजेश कुंभारदरे आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार देवुन गौरविण्या आले. यावेळी पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे हे ही उपस्थित होते.
महाबळेश्वर तालुक्यातील हायस्कुल व जुनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी सोशल मिडीया शाप कि वरदान, वाहतुक नियंत्रण, महिलांची छेडछाड, डॉल्बी मुक्त अभियान, रॅगिंग, बालक व स्त्रियांवर होणारे अत्याचार, भ्रष्टाचार व गर्भलिंग निदान हे विषय चर्चेसाठी देण्यात आले होते. यावेळी विद्याार्थ्यांनी अतिशय परखडपणे आपली मते मांडली. विजेत्या विद्यार्थ्यांची निवड करण्याचे काम शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे व जेष्ठ पत्रकार डी. डी. कुलकर्णी यांनी केले. विद्यार्थ्यांनी चर्चेच्यावेळी जी मते मांडली. त्या मतांमुळे उपस्थित मान्यवर चांगलेच प्रभावित झाले होते. पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे अर्बन बॅकेचे अध्यक्ष राजेश कुंभारदरे नगरसेवक कुमार शिंदे यांनी यावेळी मुलांना मार्गदर्शन केले. या स्पर्धेत सेठ गंगाधर माखरीया हायस्कुल गिरीस्थान हायस्कुल छाबडा हायस्कुल महाबळेश्वर इज्युकेशन संस्था अंजुमन हायस्कुल कोयना इज्युकेशन संस्था शिरवली या शाळा व हायस्कुलने भाग घेतला होता विजेत्यांना उपनगराध्यक्ष अफजल सुतार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे नगरसेवक कुमार शिंदे मान्यवरांच्या पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे पत्रकार विलास काळे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र स्मृती चिन्ह देवुन सन्मान करण्यात आला.