डिस्कळकरांना दिलेला शब्द पाळला:आ.शशिकांत शिंदे

पुसेगाव : अनेक प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे काम राष्ट्रवादी पक्षाकडुन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीच्या विचाराचा ग्रामपंचायत असणार्‍या डिस्कळ मध्ये मागिल पाच वर्षात दिलेला शब्द या आमदार शशिकांत शिंदेनी पाळला आहे.पसूचा मळा रस्ता,तांबे वस्ती रस्ताची कामे सुरू असून पसूच्या मळातील नागरीकांचा पाणी प्रश्‍न सोडवण्यासाठी पाणी पुरवढा योजना आमदार फंडातून मंजूर केली असून डिस्कळकरांनी आपल्या मताचे दान आमच्या जोर्तिलिंग पॅनेलच्याय परड्यात टाकावे आणि आमचा सरपंचपदाचे उमेदवार डॉ.महेश पवार यांना प्रचंड मताने विजयी करून इतिहास घडवावा असे आवाहन आमदार शशिकांत शिंदे यांनी केले
वार्ड क्रमांक चार मधील कोपरासभेत ते बोलत होते यावेळी सरपंचपदाचे उमेदवार डॉ.महेश पवार, दत्तात्रय तांबे,समीर तांबे,शामराव कर्णे,धनाजी तांबे,माजी सरपंच राजीव शिपटे,उदय शिंदे,प्रदिप गोडसे,प्रकाश घाडगे,नथुराम मदने,गिरीश घोरपडे यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
यावेळी जेष्ठ नागरीक दत्तात्रय तांबे म्हणाले तांबेवस्ती मधील नागरीकांच्या कामासाठी सदैव साथ देणार्‍या आमदारांच्या मागे मोठी ताकद उभी करणार असून आपण आपला शब्द पाळला आता येणार्‍या ग्रामपंचायत निवडणूकीत सरपंचपदाचे उमेदवार डॉ. महेश पवार यांच्यासह सर्व उमेदवार मोठया ताकदीने निवडूण देउ असे वचन तांबे वस्ती यांच्या वतीने देत असल्याची ग्वाही जेष्ठ मार्गदर्शक दत्तात्रय तांबे यांनी दिली. महीला संघटक मुक्ताबाई तांबे म्हणाल्या गावाच्या विकासाठी चांगला उमेदवार सरपंच असणे गरजे आहे आणि डॉ महेश पवार यांच्या सारख्या दुसरा पर्याय नाही
यावेळी रत्नाबाई जाधव,वनिता कुंभार,रामचंद्र कर्णे,सौ.लता कर्णे, सुहास कर्णे,राजेंद्र मदने, विमल आडके,संदीप कर्णे, मोनाली घाडगे, सारीका घाडगे या उमेदवारांसह प्रत्येक वार्डातील पदाधिकारी,कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते.