म्हासुर्णे येथील आयसोलेशन सेंटरला जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची धावती भेट ; खटाव तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची म्हासुर्णेत भेट

तुषार माने
म्हासुर्णे प्रतिनिधी :- सध्या महाराष्ट्रात काही जिल्ह्यात कोरोनाचा कहर कुठेतरी कमी होत असलेला दिसुन येत आहे.काही जिल्ह्यामध्ये नियम शिथील करण्यात आले असुन काही जिल्ह्यात आतिशय कडक निर्बंध संबधित जिह्याच्या जिल्हाधिकारी यांनी लावले आहेत त्यातच आपल्या सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील काही गावात कोरोनाने थैमान घातले असुन रुग्ण संख्या कुठेच कमी होत नसल्याने प्रातंअधिकारी यांनी पुन्हा नव्याने आदेश काढुन रुग्ण सख्या जास्त असणाऱ्या गावामध्ये कडक निर्बंध घातले आहेत त्यातील काही गावामध्ये खटाव तालुक्याच्या दौऱ्यावर असणाऱ्या जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी भेटी दिल्या.त्यामध्ये कराडहुन चितळी दिशेने जात असताना रोडवर असणाऱ्या म्हासुर्णे आयसोलेशन सेंटरला जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी धावती भेट दिली भेटी दरम्यान गावातील कोरोना पॉझीटीव रुग्णांचा आढावा घेतला.तसेच आयसोलेशन सेंटरला किती रुण आहेत.दवाखान्यात किती रुग्ण आहेत,आयसोलेशन सेंटरच्या रुग्णांना कोणकोणत्या सुविधा पुरवत आहात,ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगाची रक्कम किती आली आहे त्या रकमेतुन ग्रामपंचायतीने कोणत्या सुविधा पुरवल्या असे ग्रामविकास अधिकारी यांना विचारण्यात आले,जे रुग्ण आयसोलेशन सेंटरला आहेत त्याच्या घरी जनावरे आहेत त्यांची व्यवस्था दक्षता कमेटीने कशी केली आहे.असे अनेक प्रश्न जिल्हाअधिकारी शेखर सिंग यांनी दक्षता कमेटी अध्यक्ष व कमेटीस विचारणा केली असता दक्षता कमेटीच्या अध्यक्ष व कमेटीने सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.जिल्हाधिकारी यांनी अतिशय चांगल्या प्रकारचे नियोजन केल्याबद्दल गावाचे कौतुक केले.जिल्हाधिकारी यांच्या यांच्या कडे म्हासुर्णे कोरोना दक्षता कमेटीने म्हासुर्णे प्राथमिक आरोग्य उपकेद्रास कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध व्हावेत अशी मागणी केली.मागणीची तात्काळ दखल घेवुन जिल्हाधिकारी यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी इन्नुस शेख यांना सुचना दिल्या. जिल्हाधिकारी यांच्या भेटी दरम्यान जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या सोबत आज मा. प्रांताधिकारी श्री.जनार्दन कासार साहेब, खटाव तहसीलदार श्री किरण जमदाडे साहेब, गट विकास अधिकारी श्री रमेश काळे साहेब, तालुका आरोग्य अधिकारी डॉ इन्नुस शेख, मायणी सहा.पोलिस निरीक्षक श्री शहाजी गोसावी,व तलाठी,ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.तसेच म्हासुर्णे कोरोना दक्षता कमेटी अध्यक्ष सचिन माने,उपसरपंच विठ्ठल माने,शिक्षण संस्थेचे चेअरमन महादेव माने,मा.उपसरपंच अजित माने,पोलीस पाटील संभाजी माने, ग्रामपंचायत सदस्य तुषार माने,सिंकदर मुल्ला,गुलाब वायदंडे,सुहास माने,आबा यमगर ,सिस्टर आशा काळे तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते