Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीडॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे अपुर्‍या सुविधंासाठी निदर्शने

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे अपुर्‍या सुविधंासाठी निदर्शने

कराड ः येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतिगृहात ठेकेदारांच्या मुजोरीला कंटाळून विदयार्थ्यानी उपाशीपोटी निदर्शने केली सकाळ पासून मुले उपाशी असल्याने त्यातील तीन विदयार्थ्याना भोवळ आली त्यांना तातडीने ड्राईव्हरचा डबा खायला दिला.
यावेळी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहातील तक्रारी जाणुन घेण्यासाठी निवास थोरात, सागर थोरात, आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन आवळे, जे.के. पाटील, अभिरात वाघमारे, निलेश पवार आदींनी भेट दिली. विद्यार्थ्यांनी तक्रारीमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण तेही पुरेसे नाही नियमानुसार दररोज दोन फळे न देता एकच फळ तेही निकृष्ट दर्जाची, अंडी मिळत नाहीत.
बेजबाबदार ठेकेदारांचे वागणे, कुलर, सोलर बंद अवस्थेत ठेवतात. पाण्याचा अनियमित पुरवठा, कर्मचार्‍यंाची दमदाटी अंथरूण अस्वच्छ असुन ती वेळेत धुतली जात नाहीत. अधिकार्‍यंाकडे तक्रार करूनही ठेकेदारांवर कारवाई नाही. आदीच इतर तक्रारी लेखी स्वरूपात देवुनही कोणतीही कारवाई न केल्याने अखेर मुलांना उपाशीपोटी निदर्शने करावी लागली फळांची अन्नाची पहाणी केली असता. न तुटणारी चपाती व नासकी फळे निदर्शनास आले. ठेकेदाराला फोन केला असता त्यांने बाहेर असल्याचे सांगुन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.व उडवाउडवीची उत्तरे दिली.
तत्पुरर्वी .2.30. वाजता समाजकल्याण चे सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांनी घटनास्थळी भेट देवुन दोन दिवसांत विद्यार्थ्यांच्या तक्रारीचे निवारण करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी निदर्शने थांबवले

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular