Friday, June 20, 2025
HomeUncategorizedहुतात्मा क्रांती प्रतिष्ठानतर्फे वक्तृत्व,निबंध स्पर्धा उत्साहात

हुतात्मा क्रांती प्रतिष्ठानतर्फे वक्तृत्व,निबंध स्पर्धा उत्साहात

म्हासुर्णे (प्रतिनिधी तुषार माने) :- हुतात्मा क्रांती प्रतिष्ठान जयराम स्वामी वडगाव यांच्या वतीने तालुकास्तरीय वक्तृत्व,निबंध स्पर्धा उत्साहात पार पडल्या.विजेत्यांना हुतात्मा दिनी हुतात्मा अभिवादन कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले

स्पर्धाचे आयोजन वडगाव येथील जयराम स्वामी विद्यालयात घेण्यात आल्या होत्या.इयत्ता पाचवी ते सातवी गटात म्हासुर्णे येथील श्रीराम विद्यालयाची विद्यार्थीनी कु.श्रध्दा उत्तम माने या विद्यार्थीनीने प्रथम क्रमांक मिळवला त्याबद्दल त्या विद्यार्थीनीला महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती नामदार रामराजे नाईक निबांळकर याच्या हस्ते व सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निबांळकर,जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे,व मार्गदर्शक शिक्षक परदेसी (सर)यांच्या उपस्थितत बक्षिस देण्यात आले या यशाबद्दल श्रध्दा माने हिचे श्रीराम विद्यालयाचे चेअरमन महादेव माने,व्हा.चेअरमन शिवाजी माने,सेक्रेटरी राजाराम माने,सर्व संचालक मंडळ व म्हासुर्णे गावचे सरपंच सचिन माने,उपसरपंच सुहास माने,ग्रामपंचायत सदस्य तुषार माने,विठ्ठल माने,श्रीधर माने,सिकंदर मुल्ला,शाळेचे मुख्याध्यापक पी.व्हि.हांडे,उपशिक्षक राठोड सर व सर्व शिक्षक म्हासुर्णे गावातील ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular