फ्रान्सचा जर्मनीवर 2-0 विजय
इमार्सेली : परंपरागत प्रतिस्पर्धी जर्मनीवर 2-0 असा विजय मिळवत फ्रान्सने युरो चषक 2016 फुटबॉल स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. तब्बल 16 वर्षानी यजमानांनी फायनलफमध्ये धडक मारली. दोन्ही गोल करणारा मिडफिल्डर अँटोईन ग्रीझमन त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
दुसर्या उपांत्य लढतीत शुक्रवारी पहिल्या सत्रातील जादा वेळेत फ्रान्सला पेनल्टी कॉर्नर मिळाला. या कॉर्नरवेळी प्रतिस्पर्धी संघातील पॅट्रिक इवरासोबत चेंडूवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात जर्मनीचा कर्णधार बॅस्टियन श्वाईनटीगरने चेंडू हाताळल्याने इटलीचे रेफ्री निकोला रिझोली यांनी फ्रान्सला पेनल्टीफ बहाल केली.
रेफ्रींच्या या निर्णयावर जर्मनीच्या फुटबॉलपटूंनी नाराजी व्यक्त केली. पेनल्टीफवर गोल करत ग्रीझमनने यजमानांचे खाते उघडले. हाच सामन्याचा टर्निग पॉईंटफ ठरला. दुसर्या सत्रात 78व्या मिनिटाला पॉल पॉग्बाच्या मदतीने ग्रीझमनने दुसरा गोल करताना फ्रान्सची आघाडी वाढवली.
गोलकीपर मॅन्युअल न्युअर पुढे आल्याचा फायदा उठवत ग्रीझमनने चेंडू केवळ गोलपोस्टच्या दिशेने ढकलला. ग्रीझमनच्या सर्वोत्कृष्ट खेळामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धात तब्बल 58 वर्षानी फ्रान्सला जर्मनीला हरवता आले.
फ्रान्सने दोन गोल करताना एकतर्फी विजय मिळवला तरी 2014 युरो चषक विजेत्या जर्मनीने चेंडूवर अधिकाधिक ताबा ठेवला. पहिल्या सत्रात त्यांना गोल करण्याची तीन संधी होत्या. मात्र थॉमस म्युलरला अन्य सहकार्यांची साथ लाभली नाही. फॉरवर्ड जोशुआ किमिचचा एक जोरकस फटका गोलपोस्ट जवळून गेला.
गोल करण्याच्या संधी हुकल्याने जर्मनीचे प्रशिक्षक जोकीम लू खूप निराश झाले. दुसरीकडे, 2000 नंतर युरो चषकाच्या अंतिम फेरीत पोहोचल्याने फ्रान्सचे प्रशिक्षक डिडियर देशचँप आनंदी झालेत. मात्र त्यांनी प्रतिस्पर्ध्याचेही कौतुक केले आहे.जर्मनी एक अव्वल संघ आहे.
आम्हाला त्यांच्याकडून कडवा प्रतिकार अपेक्षित होता. परंतु, जर्मनीला आम्ही रोखले. तसेच वर्चस्व गाजवले. आमच्याकडे अनेक गुणवान फुटबॉलपटू आहेत. मी त्यांच्यावर नेहमीच विश्वास दाखवला आहे, असे देशचँप म्हणाले.