औंध(वार्ताहर):- लॉकडाऊनच्या काळात औंध परिसरातील गरजू व गरीब ५० कुटुंबाना जीवनाश्यक वस्तूंचे किट
माण तालुक्यातील श्रावणी चँरिटेबल ट्रस्टचे संस्थापक व सोलर क्षेत्रात नाव गाजविणारे माण तालुक्यातील युवा उद्योजक संदिपशेठ घोरपडे यांच्या मार्फत कोरोनामुळे अडचणीत आलेल्या औंध येथील पन्नास गरजू कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. संदिप घोरपडे यांनी ऐन अडचणीच्या काळात दिलेल्या मदतीमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
यावेळी अलिम मोदी,चंद्रकांत पवार, काका घार्गे,धनाजी आमले, मेजर
वसंत पवार,गणेश चव्हाण,प्रदीप गुजर,नामदेव भोसले,वसंतराव गोसावी, सावता यादव,संतोष भोसले, ग्रा,प,सदस्य सुधीर फडणीस,संजय भोसले, मीनाताई रणदिवे, सोमनाथ जाधव, संभाजी कुंभार
तलाठी तडवळेकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते गणेश चव्हाण व नामदेव भोसल यांनी हे साहित्य गरजूंना मिळावे यासाठी प्रयत्न केले.
यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते आलिमभाई मोदी म्हणाले की, श्रावणी चँरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून संदिपशेठ घोरपडे जे काम गोरगरीब जनतेसाठी करत आहेत ते निश्चितच कौतुकास्पद आहे. अतिशय कठीण प्रसंगी त्यांनी मदतीचा हात देऊन गरजू कुटुंबांना धीर दिला आहे. त्याबद्दल औंधकरवासिया त्यांचे कायम ऋणी राहतील.
गणेश चव्हाण म्हणाले की, निसर्गाने पुन्हा आपणास दाखवून दिले आहे की मानवता हीच श्रेष्ठ आहे. त्यामुळे यापुढील काळातही समाजातील दुर्लक्षित, दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रयत्नशील राहणार आहोत.यासाठी युवानेते शेखरभाऊ गोरे ,उद्योजक संदिपशेठ घोरपडे यांचे सहकार्य घेणार आहोत. संदिपशेठनी ऐन अडचणीच्या काळात केलेल्या मदतीबद्दल चव्हाण यांनी त्यांना धन्यवाद दिले.
नामदेव भोसले म्हणाले की, यापुढील काळातही गरजू कुटुंबातील विद्यार्थ्यांना ,रुग्णांना जास्तीत जास्त मदत विविध सामाजिक संस्थांकडून मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत.
श्रावणी चँरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून संदीपजीं नी पुणे ,मुंबई शहरातील परप्रांतिय ,गोरगरीब ,गरजू लोकांना जीवनश्यक वस्तू देत दोन महिने दत्तक घेतले आहे. तेच काम आपल्या मायभूमीत करत खटाव – माण तालुक्यातील १०० कुटुंबांना या परिस्थितीत ते जीवनावश्यक साहित्यरूपी मदत करत आहेत.त्यांच्या या मदतीमुळे आपल्याला कोरोनाशी दोन हात करण्याची ऊर्जा मिळणार आहे.
संदीपजीं नी माण खटाव तालुक्यातील गरीब ,होतकरू मुलांमुलींना तसेच कुस्तीपट्ट महिलांना दत्तक घेतले आहे.
त्यांचे उद्योगीक कार्याबरोबरच शैक्षणिक ,सामाजिक कार्य चांगले आहे.
संदीपशेठजीं नी आपल्याला एक संदेश दिला आहे की प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करा , घरातून बाहेर पडू नका.अन सर्वंनी काळजी घ्या असे सांगितले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश चव्हाण व नामदेव भोसले यांनी केले.

