वाई : वेलंग (ता. वाई) येथील अंगणवाडी सेविका संघटनेची राज्य पदाधिकारी मंगल जेधे या गेल्या दीड महिन्यापासून आरोपी संतोष पोळ याने बेपत्ता केल्या होत्या.
आरोपी पोळ याची सहकारी ज्योती मांढरे हिच्या कबुली जबाबामुळे पोळच्या काळया कारनाम्याची उकल झाली व पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या, पोळ याने दाखविलेल्या जागेत तीचा मृतदेह गुरूवारी सायकाळी पाच वाजता आढळून आला.
मृतदेहाचे जाग्यावरच शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला रात्री साडेआठ वाजता जेधे यांच्यावर वेलंग येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. वेंलग गावात स्मशान शांतता पसरली आहे.
दरम्यान, आरोपी संतोष पोळ व त्याची साथीदार ज्योती मांढरे हिला आज पोलिसांनी न्यायालयासमोर उभे केले असता पोळ याला सातदिवसाची पोलिस कोठडी तर ज्योती मांढरे हिला चार दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस निरिक्षक विनायक वेताळ यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलिस प्रशासन करित आहे.
तर गुन्हयांचा सिलसिला थांबला असता
संतोष पोळ यांने डॉक्टरी बुरखा पांगरून अनेक प्रकारचे गुन्हे केले असून यामध्ये अनेक क्षेत्रातील लोंकाना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. अनेक गुन्हे केल्याने त्याचा आत्मविष्वास वेळोवेळी वाढत गेल्याने त्याने अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे राजरोषपणे केले. अशा प्रवृत्तीला वेळीच पायबंद केला असता तर त्याचा बरखा फाटला असता व गुन्हयांचा सिलसिला वेळीच थांबला असता अशी कुजबुज नागरीकांमध्ये ऐकण्यास येत आहे.
अनेक गुन्हयांची होणार उकल
संतोष पोळ हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून मंगल जेधेच्या खूनाचे खरे कारण उघड होणार आहे तसेच अशाप्रकारच्या अनेक संशय त्याच्यावर आहेत. विविध गुन्हयामध्ये संशयीत किडणी रॅकट, यापुर्वी गायब झालेल्या महिला, चोरी, पैशासाठी ब्लॅकमेल करणे, जमिन खरेदी विक्री व्यवहारात फसवणूक अशा विविध प्रकारच्या गुन्हयामध्ये उकल होण्याची शक्यता आहे.