औंध:-ग्रीन पॉवर शुगर्स लि. गोपुज या साखर कारखान्याकडे चालू हंगामात गळीतासाठी येणाऱ्या ऊसाचा पहिला हप्ता एफआरपी अधिक दोनशे रुपये दर देणार असल्याची माहिती जनरल मॅनेजर हणमंतराव जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
यामध्ये पुढे म्हटले आहे की,सातारा जिल्ह्यातील ऊस दर सोडविण्यासाठी सोमवारी दि.६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी श्वेता सिंघल,पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांचेसह शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी व साखर कारखान्याचे प्रतिनिधी यांच्यात महत्वपूर्ण बैठक झाली,सदर बैठकीत कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणे सातारा जिल्ह्यात एफआरपी अधिक दोनशे रुपयांचा ऊस दर सर्वानुमते मान्य करण्यात आला.
यंदा सभासद,ऊस उत्पादक शेतकरी यांनी जास्तीत जास्त ऊस गाळपासाठी कारखान्याकडे पाठवावा असे आवाहन जनरल मॅनेजर हणमंतराव जाधव यांनी केले.
ग्रीन पॉवर एफआरपी अधिक दोनशे रुपये दर देणार-हणमंतराव जाधव
RELATED ARTICLES