सातारा दि22 : या आठवड्यात सातारा जिल्ह्यात दमदार पावसाने चांगलीच हजेरी लावली असून जिल्ह्यातील धरण व तलावांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पर्यटकांनी खात्री करूनच पर्यटनासाठी सातारा जिल्ह्यात यावे असे सूचित केले जात आहे. तसेच कोयना धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावांतील लोकांनी काळजी घ्यावी. राज्यातील महत्वाच्या कोयना धरण व तलाव परिसरातील पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पाऊस चालू आहे. मागील १२ तासात धरणामध्ये ६.४७ टी एम सी पाण्याची आवक झाली असून धरणाची पाणी पातळी ७ फूट५ इंच वाढली आहे.आज रोजी सकाळी धरणाची पाणी पातळी २१२४ फूट ३ इंच झाली असून धरणामध्ये ६४.९८ टी एम सी म्हणजे ६२ टक्के (62 %) पाणीसाठा झाला आहे.
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील पर्जन्यमापक केंद्रामधील मागील १२ तासातील पर्जन्यमान खालीलप्रमाणे आहे.कोयनानगर २५६ मि.मी.नवजा ३०६ मि.मी.
महाबळेश्वर ३०३ मि.मी.
उरमोडी धरण पाणी पातळी ६८८.९८ मी
एकूण साठा१८०.०५९ दलघमी/ ६.३५ टीएमसी म्हणजे ६३.८२ टक्के धरण भरले आहे.
कण्हेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने या चोवीस तासात ९२.००मि.मी.पाऊस झाला आहे व धरणाच्या पाणी पातळीत २.२७ मी.ने वाढ झाली असुन सरासरी पाणी आवक १२३३१ क्यु.आहे. तरी मंजूर जलाशय परिचलन आराखड्या प्रमाणे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दुपारी धरणातून ५००० कयु. विसर्ग नदी पात्रात सोडण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातील विशेषतः कराड, खटाव, माण, कोरेगाव, सातारा,वाई तालुक्यातील काही भागात नदी व ओढ्याच्या काठी अनधिकृत वाळू उपसा होत असल्याने नदी पात्रात मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे दुर्घटना घडण्याची ही शक्यता निर्माण झाली आहे, अशा तक्रारी अनेक नदी व ओढ्याच्या लगत राहणाऱ्या ग्रामस्थांनी केली आहे.