कोयना पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्यात पाऊसाचा कहर ; बारा तासात नवजा येथे 427 मि.मी. पाऊसाची विक्रमी नोंद ; मुळगाव, जुना संगमेश्वर धक्का पुल पाण्याखाली ; कोयना, केरा, मोरणा, काजळी, काफनी, तारळी, वांग, आदी नद्या तुडुंब ; अनेक ठिकाणी रस्त्यावर, पुलावर पाणी ; पुन्हा शेतीचे प्रचंड नुकसान, शेतकरी हवालदिल ; कोयना धरणातून पाणी सोडण्याचा इशारा.

पाटण:- पाटण तालुक्यात पाऊसाने कहर केला असून कोयना पाणलोट क्षेत्रासह संपूर्ण पाटण तालुक्यात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. मुळगाव, जुना संगमेश्वर धक्का पुल पाण्याखाली गेले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावर आणि पुलावर पाणी आले आहे. अशा परस्थितीत रस्ता ओलांडण्याचे धाडस कोणीही करु नये असे आहवान प्रशासकीय यंत्रणेकडून करण्यात आले आहे. मागील बारा तासात कोयना पाणलोट क्षेत्रात 427 मि.मी. पाऊसाची विक्रमी नोंद झाली आहे. तर बारा तासात कोयना धरणात 8.25 टि.एम.सी. पाणी वाढले आहे. एकुण पाणी साठा 66.75 टि.एम.सी झाला आहे. पाण्याची वाढती आवक लक्षात घेता कोयना धरणातून पाणी सोडण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर कोयना नदीच्या असलेल्या उपनद्या केरा, मोरणा, काजळी, काफनी आदी नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. मोरणा-गुरेघर धरणाच्या सांडव्यावरुन पाणी सोडण्यात आले आहे. सर्वच नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
काल पासून पावसाने पाटण तालुक्यात पुन्हा जोर धरला असताना मुसळधार पावसाच्या सरीवर सरी कोसळत आहेत. अनेक ठिकाणी ओढे, नाले, नद्या तुडुंब भरून वाहत आसताना पुन्हा एकदा शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. गेल्याच महिन्यात 16 जून रोजी झालेल्या ढगफुटी नंतर पुन्हा ढगफुटी सद्रुश्य परस्थिती निर्माण झाली असून मागच्या ढगफुटीतून सावरत आसताना अवघ्या महिन्याभरात झालेल्या या परस्थिती मुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाच्या प्रचंड पाण्याच्या ओघाने अनेक ठिकाणी शेतीचे बांध फुटून शेती वाहून गेली आहे. अनेक ठिकाणी शेतात दगडांचे खच वाहून आले आहेत. अशीच परिस्थिती शेतीची कायम राहिल्यास शेतकऱ्यांनी कस जगाव असे प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावू लागले आहेत.
काल रात्री 8 वा. ते सकाळी 8 वा. या 12 तासात कोयना पाणलो क्षेत्रासह पाटण तालुक्यात पावसाने कहर केला आहे. कोयना धरणात प्रतिसेकंद 1लाख 73 हजार 935 क्युसेक्स पाण्याची आवक येत असून कोयना धरणातील पाणी साठा झपाट्याने वाढत आहे. मागील बारा तासात कोयना धरणात 8.25 टि.एम.सी. पाणी वाढले आहे. एकुण पाणी साठा 66.75 टि.एम.सी झाला आहे. पाण्याची वाढती आवक लक्षात घेता कोयना धरणातून पाणी सोडण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर कोयना नदीच्या असलेल्या उपनद्या केरा, मोरणा, काजळी, काफनी आदी नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. मोरणा-गुरेघर धरणाच्या सांडव्यावरुन पाणी सोडण्यात आले आहे. सर्वच नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.