परळी :- संकट कधी ही एकट येत नसते.मात्र, त्याही संकटात आधार देणारेच खरे माणूसकी म्हणून माणूस असतात.स्वतःबरोबर दुसऱ्याची काळजी करणारे याच संकटाला परतावून लावतात.मुंबईत कोरोनाचा आकडा दररोज वाढत चालला आहे.हातचे काम बंद झाले म्हणून गावी आलेल्या कुटूंबाने आपला गाव जवळ केला.परळी भागात नित्रळ येथे दाखल झालेल्या त्या कुटूंबाला आधार दिला तो धरणात बुडालेल्या बेघराने. त्या घरात सध्या हे कुटूंब राहत आहे.स्वतःची आणि गावची काळजी घेत कोरोन टाइन झाले आहे.
कोरोना हे जगावर संकट आले आहे.या संकटामुळे जगातल्या शहरांसह गावागावांत परिणाम झाला आहे. मुंबईत अनेक चाकरमानी आहेत.त्या चाकरमान्यांपैकी काहींनी लॉक डाऊनच्या आधी तर काहींनी परवानगी मिळाल्यानंतर गावाकडे रवानगी मिळेल त्या वाहनांची व्यवस्था करून गावाला रवाना होत आहेत.त्यात गावी आल्यावर गाव गावात घेईल का नाही तो ही वेगळाच मुद्दा आहे.सातारा तालुक्यातील उरमोडी हे धरण अगोदरच धरणग्रस्त्यांच्या जीवावर उठलेले आहे.अनेकांच्या जमिनी धरणात गेल्या, ज्या मिळाल्या त्या खडकाळ, दुष्काळी भागात.त्यामुळे शेत पिकना म्हणून काहींनी मुंबईत मिळेल ते काम करून राहू लागले.तोच कोरोनाचा विळखा मुंबईत पडू लागला.हातचे काम बंद झालं.पोटाची भाकर थांबली गेली म्हणून परवाना घेऊन एक कुटूंब गावी आले.गावात सोय नसल्याने धरणात पाण्यात बुडालेले घरात गावच्या आणि स्वतःच्या सुरक्षिततेसाठी राहू लागले. पाण्यात बुडालेल्या त्या घराने कोरोनाच्या संकटात आधार दिला.पुन्हा त्याच आठवणी जाग्या झाल्या.ते कुटूंब आज ही जुन्या आठवणींना उजाळा देत नव्या दिवसाशी लढा देण्यासाठी सज्ज झाले आहे.
मुंबईहून आलेले सोनावणे कुटूंब गावाच्या हितासाठी राहिले गावाबाहेर
RELATED ARTICLES

