अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधीत नागरीकांना मदत करावयाची असल्यास तहसिल कार्यालय जावली येथे संपर्क साधावा :- तहसिलदार श्री. राजेंद्र पोळ

मेढा ( वार्ताहर )अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधीत नागरीकांना मदत करावयाची असल्यास तहसिल कार्यालय जावली येथे संपर्क साधावा असे आवाहन जावलीचे तहसिलदार श्री. राजेंद्र पोळ यांनी केले आहे.
सध्या जावळीत पावसाचा हाहाकार माजला असून या परिस्थितीत अतिवृष्टी, पुरामुळे त्या त्या विभागातील परिस्थीतीप्रमाणे सेवा पुरविणे गरजेचे बनले असून जर कोणाला मदत करावयाची आहे त्यांनी ब्लॅंकेट, चादरी , बिस्किट, चिवडा फरसाण राजगिरा लाडू या स्वरूपामध्ये स्नॅक्स तसेच तांदूळ, आटा ,डाळ ,तेल ,तिखट मीठ इत्यादी कोरडा शिधा अथवा इतर आवश्यक ती मदत तहसिल कार्यालय मेढा येथील पुरवठा विभागात जमा करणेचे आवाहन केले आहे.
या कार्यात सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन तहसिल कार्यालया मार्फत करण्यात आले असून जावली तालुक्यामधील जी गावे बाधित झाली आहेत अशा गावातील नागरीकांनी अन्नधान्य अथवा इतर स्वरुपाची मदतीकरीता हेमंत धुमाळ पुरवठा निरीक्षक जावली— 7350352772 ,श्री.कर्णे शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती मेढा –9405133432 ,श्री.पवेकर, विस्तार अधिकारी पंचायत समिती मेढा—7588059424 श्री दशरथ इटूबोने- ८८८८६९४२५४ यांचे भ्रमणध्वनीवर तात्काळ संपर्क करावा असेही सुचित करण्यात आले आहे.