सातारा : महाराष्ट्र शासनाने गुटखा विक्री बंदी घातली असताना सातारा शहरात सर्वत्र खुलेआम पानटपरी, किराणा दुकान, शाळा, कॉलेज परिसरात गुटखा विक्री सुरु आहे. याबाबत येत्या 15 दिवसात सातारा शहरातील गुटखा विक्री पूर्ण बंद न झाल्यास सातारा शहर शिवसेनेच्यावतीने अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा सातारा शहर शिवसेनेच्यावतीने निवेदनाव्दारे दिला आहे.
या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, निमिष शहा, उपशहर प्रमुख शिवाजीराव इंगवले, सयाजी शिंदे, मारुती वाघमारे, अनिल माशिद, सुनिल भोसले, विभाग प्रमुख नितीन लकेरी, संतोष निगडकर, अक्षय चावरे, सचिन गायकवाड, सुमित नाईक, महेश पाटील, तालुका प्रमुख दत्तात्रय नलवडे, आकाश जाधव, उपतालुकाप्रमुख रमेश बोराटे, मंगेश जाधव, शिवाजी पवार, किसनराव नलवडे, सचिन जगताप, सागर साळुंखे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवेदनाची प्रत राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री व जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना माहिती व कार्यवाहिसाठी दिलेली आहे.
अवैध गुटखा विक्री प्रकरणी शिवसेनेच्यावतीने निवेदन
RELATED ARTICLES