Friday, June 20, 2025
HomeUncategorizedपत्रकार मारहाण प्रकरण : खटाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने पोलिसांना निवेदन

पत्रकार मारहाण प्रकरण : खटाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने पोलिसांना निवेदन

पुसेगाव/प्रतिनिधी :- ‘प्रभात’दैनिकचे पुसेगाव प्रतिनिधी प्रकाश राजेघाटगे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ खटाव तालुक्यातील सर्व पत्रकारांनी एकत्रित येत पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना निवेदन देऊन घटनेचा निषेध नोंदवला.
बुध ता. खटाव येथील रहिवासी आमिर शमशुद्दीन शेख व त्याचा भाऊ जहांगीर शमशुद्दीन शेख यांनी पत्रकार प्रकाश राजेघाटगे(रा. बुध) यांच्या घरात जाऊन नातेवाईकांवर गुन्हा नोंद झाल्याची बातमी छापल्याचा जाब विचारात लाथाबुक्यांनी मारहाण करत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या दोन्ही हल्लेखोरांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी या निवेदनाद्वारे पत्रकारांनी करून या घटनेचा निषेध नोंदवला. निवेदन देताना सलीम आतार, प्रा. केशव जाधव, संतोष साळुंखे, संदीप जाधव, नम्रता भोसले, संजय देशमुख, केशव कचरे, अविनाश कदम, राजेंद्र शिंदे, किरण देशमुख, नितीन राजे, विशाल सूर्यवंशी, पंकज कदम, ऋषीकेश पवार यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular