सह्याद्रिच्या राष्ट्रवादी बैठकीकडे उदयनराजे गटाची पाठ
कराड : जिल्हा परिषदेचे कृषी सभापती शिवाजीराव शिंदे यांच्यावरील 30 तारखेच्या अविवास ठरावा संदर्भाने येथील सह्याद्री सहकारी कारखान्याच्या गेट हाऊस वर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची कमराबंद बैठक पार पडली. या बैठकीस पक्षाचे वरीष्ठ नेते व काही जिल्हा परिषद सदस्यांचीच उपस्थिती होती. मात्र खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचे समर्थक व जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नाराज सदस्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्याचे चित्र होते. या बैठकीत अविश्वासाच्या ठरावावरुन पक्षाला कमीपणा येणार नाही याची काळजी सर्व सदस्यांनी घेऊन वेळ प्रसंगी शिंदेंच्या विरोधात मतदान करावे असे उपस्थित सदस्यांना नेत्यांनी सुनावल्याचे वृत आहे.
जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीच्या तंबूत कृषी सभापती शिवाजीराव शिंदे यंाच्यावरील अविश्वासाच्या ठरावाने रान उठले आहे. येत्या 30 जुलै रोजी शिंदे यांच्या विरोधात अविश्वास ठराव पारीत करण्याचा विडा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उचलला आहे. या संदर्भातील राजकीय रणनीती ठरवण्यासाठी कराड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील गेट हाऊसमध्ये राष्ट्रवादीचे नेते व जिल्हा परिाद संदस्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यास राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष आ. शशिकांत शिंदे, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, जेष्ठ नेते लक्ष्मण तात्या पाटील, आ. मकरंद पाटील, आ. बाळासाहेब पाटील यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. सदरच्या बैठकीस राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. मात्र यात निमंत्रित सदस्यांंची संख्या अल्प होती. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराज जिल्हा परिषद सदस्य व खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचे समर्थक तसेच माण तालुक्यातील सदस्यांनीही या बैठकीकडे पाठ फिरवल्याचे चित्र होते.
कमरा बंद खलबतांचा राजकीय शनिवार
RELATED ARTICLES