कराडः लोकांच्या मागणीनुसार विकासकामांची पूर्तता करण्यासाठी आ. पृथ्वीराज चव्हाण कायम तत्पर आहेत. घारेवाडीतील लोकांना जानाई मंदिरामागे स्नानगृह गरजेचे होते. त्याबाबत लोकांनी बाबांना मागणी केली. व ती लवकर पूर्णही झाली. पृथ्वीराजबाबांचा दृष्टीकोन मतदारसंघातील लोकांना सोयी-सुविधा सुलभपणे मिळाल्या पाहिजेत यावर केंद्रीत आहे. असे मत युवा नेते इंद्रजीत चव्हाण यांनी व्यक्त केले.
घारेवाडी (ता. कराड) येथील श्री जानाई मंदिरामागे आमदार फंडातून उभारलेल्या स्नानगृह लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपसरपंच राजाराम घारे होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, पंचायत समिती सदस्या नंदाताई यादव, सयाजीराव यादव, येरवळेचे सरपंच सुभाषराव पाटील, शिंदेवाडीचे सरपंच निवासराव शिंदे, जे. के. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. चव्हाण म्हणाले, लोकांनी आपले आरोग्य नीट राखण्यासाठी सभोवतीच्या सोयी-सुविधा सुसज्ज आहेत का याचा बारकाईने विचार करण्याची गरज आहे. आपल्याबरोबर आपला परिसर नीटनेटका ठेवण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा.
शंकरराव खबाले म्हणाले, पृथ्वीराजबाबांनी आपल्या कोळे-विंग भागाचे नंदनवन फुलवले. त्यांच्या कल्पकतेमधून कराड ते ढेबेवाडी रस्ता चौपदरी झाला. हे काम या विभागातील पुढील अनेक पिढ्यांचे आयुष्य उंचावणारे आहे.
माझा जिल्हा परिषदेचा फंड सुरु झाला की, घारेवाडीतील विकासकामांना प्राधान्य देईन. नंदाताई यादव यांचे भाषण झाले. तानाजीराव घारे यांनी सूत्रसंचालन केले. व हिंदूराव पुजारी यांनी आभार मानले. यावेळी डॉ. सचिन कोळेकर, श्री. रंगाटे, ग्रामपंचायत सदस्य तानाजीराव घारे, मिलींद बंडगर, बाजीराव घारे, लक्ष्मी घारे, संगिता घारे, बाबासाहेब जाधव, आनंदराव घारे, सुरेश घारे, संतोष जाधव, जयवंत घारे, विलास घारे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष हिंदूराव घारे, विकास घारे, किसन कदम, चंद्रकांत इनामदार, भगवान वगरे, राजेंद्र वगरे, अनिल माळी, आण्णा काळे, सुनिल पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पृथ्वीराजबाबांचा दृष्टीकोन मतदारसंघातील सोयी-सुविद्यांवर केंद्रीतः इंद्रजीत चव्हाण
RELATED ARTICLES