वडूज : खातवळ (ता.खटाव) येथे सोमवार दि. 29 पासून ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजकांनी दिली.
आठवडाभर चालणार्या या सोहळ्यात काकड आरती , सामुदायिक ज्ञानेश्वरी वाचन,हरिपाठ , प्रवचन , कीर्तन ,जागराचे कार्यक्रम होणार आहेत. यावेळी सुखदेवसिह राजपुरोहित , पंढरीनाथ गुरूजी , शंकर कुंभार , प्रतापसिंह फडतरे , किसन दादा उर्फ बाळासाहेब फडतरे सुनील इनामदार यांची प्रवचने तर डॉ. हेमंत निकम , इनामदार सर म्हासुर्णे , सुरेश पुजारी लिंगिवरे , अंकुश जगदाळे बोथे, प्रल्हाद महाराज कडेपूर , विलास हांडे मुंबई यांची सुश्राव्य कीर्तने होणार आहेत. धारपुडी , यलमरवाडी , मानेवाडी , पळसगाव , दाळमोडी ,हिवरवाडी व भालवडी येथील भजनी मंडळाचा जागराचा कार्यक्रम होणार आहे.
रविवार दि. 5 रोजी सकाळी 10 वाजता देहूचे केशव शिवणे यांचे काल्याचे कीर्तन झाल्यावर दिंडी सोहळा होणार आहे त्यानंतर महाप्रसाद देण्यात येणार आहे.दरम्यान,यानिमित्त आठवडाभर माऊली च्या मंडपामध्ये दानशूर व्यक्तींमार्फत सकाळी चहा -नाश्ता , व संध्याकाळी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. परिसरातील भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थ व मुंबईकर मंडळींनी केले आहे.
खातवळ येथे सोमवार पासून ज्ञानेश्वरी पारायण
RELATED ARTICLES