शिवसमर्थच्या कोळे शाखेचा आज दुसरा वर्धापन दिन

कोळे :दि शिवसमर्थ मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि; तळमावलेच्या कोळे शाखेचा दुसरा वर्धापनदिन रविवार दि.28 एप्रिल,2019 रोजी संपन्न होत आहे. त्यानिमित्त श्री सत्यनारायणाची महापुजा होणार आहे. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.जनार्दन बोत्रे व इतर मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या शाखेचा दुसरा वर्धापन दिन कोळे शाखा : कराड-ढेबेवाडी रोड,कोळे एस टी स्टॅन्ड जवळ कोळे.ता.कराड,जि.सातारा पिन 415110 फोन 9890792782 या ठिकाणी होत आहे. त्यानिमित्त थोडंसं…
15 ऑगस्ट 2006 रोजी शिवसमर्थ ग्रा.बि.शे.सहकारी पतसंस्था मर्यादित तळमावले या ठिकाणी संस्थेची स्थापना केली. पूर्णवेळ सहकार क्षेत्र निवडत समाजातील सर्व थरातील व क्षेत्रातील घटकांना/सहकार्‍यांना बरोबर घेवून सर्व कर्मचारी,अधिकारी यांच्यावर जास्तीत जास्त जबाबदारी देवून संस्था अधिक क्रियाशील कशी राहील यासाठी संपुर्ण प्रयत्न करून सहकारास चळवळीची जोड दिल्यास संस्था अधिक जोमाने वाढते.संस्थेच्या महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात एकुण 33 शाखा कार्यरत असून नियोजित पाच शाखा आहेत.
स्वच्छ, पारदर्शक कारभाराने लोकांच्या विश्‍वासास पात्र ठरल्याने अवघ्या 13 वर्षात 33 शाखांसह संस्थेने 175 कोटींची उलाढाल केली आहे. त्याचबरोबर चांगला नावलौकीक प्राप्त केला आहे. 365 दिवस 12 तास अविरत सेवा कार्यरत असते.
बदलत्या डिजीटालयझेशन युगामध्ये मिनी ए.टी.एम, ए.टी.एम, आर.टी.जी.एस, एन.इ.एफ.टी, इत्यादी सुविधा देत आहे. संस्थेचे स्वमालकीचे प्रशस्त मुख्य कार्यालय तळमावले येथे आहे.
स्वतंत्र सी.बी.एस यंत्रणा आहे,त्यामुळे सर्व शाखा मुख्य कार्यालयाशी ऑनलाइन पध्दतीने जोडल्यामुळे अचुक व तत्पर सेवा देता येते. याशिवाय संस्था व परिवार यांच्यावतीने गेल्या पाच वर्षापासुन गणराया अ‍ॅवार्ड हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
सन 2016 पासून शिवसमर्थ गौरव भूषण पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. संस्थेची सामाजिक कार्य- पिण्याच्या पाण्याची विहीरीतील गाळ काढणे व साफसफाई शिबेवाडी (गुढे)सन 2017,मान्याचीवाडी (गुढे)डोंगरावर स्मशानभुमी सन 2018 व पिण्याच्या पाण्याची साफसफाई करण्यात आली.गरजू व गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, होतकरु विद्यार्थ्यांना वहया पुस्तकांचे वाटप, महिला कुस्तीपट्टू काजल जाधव, अंध विद्यार्थी तेजस कुंभार या विद्यार्थ्यांना दत्तक घेतले आहे. गरजू स्त्री-पुरुष लोकांना वैद्यकीय मदत, सामाजिक कार्य करत असलेल्या गणेश मंडळे, नवरात्र मंडळ, देवी उत्सव,सार्वजनिक पारायण मंडळे इ.ना भरीव मदत, संस्थेतील संचालक /सल्लागार/ अधिकारी / पदाधिकारी / कर्मचारी यांचा वाढदिवस साजरा करणे, व्यापारी, संचालक, सल्लागार,अधिकारी यांच्या कलागुणांना वाव देणे, सन 2017 पासून तळमावले येथील मुख्य कार्यालयात लालबागच्या राजाची प्रतिकृतीची 11 दिवस प्रतिष्ठापना करण्यात येते.
संस्थेस व साहेबांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे उदा.स्पंदन जीवन गौरव पुरस्कार, प्राईड ऑफ इंडिया-भास्कर अ‍ॅवार्ड, गुंफण सामाजिक पुरस्कार, राज्यस्तरीय आदर्श चेअरमन पुरस्कार, युनिटी गौरव अ‍ॅवार्ड, समाज भूषण पुरस्कार, उत्कृष्ट चेअरमन पुरस्कार, सहकार रत्न पुरस्कार, सहकार भूषण पुरस्कार असे पुरस्कार मिळाले आहेत ही संस्थेच्या प्रगतीची पोच पावती आहे.
लोकांच्या सुखदु:खामध्ये खंबीरपणे संस्था व शिवसमर्थ परिवार उभा असतो. कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली तरी त्याला धीर देण्याचे तसेच त्यांना समाजात ताठ मानेने उभे करण्यासाठी संस्था व परिवार झटत असतो. सहकारामधील एक विश्‍वासू चेहरा असलेल्या शिवसमर्थ परिवाराची सामाजिक बांधिलकी पाहता परिवाराने मातीशी नातं जपत लोकांना प्रगतीच्या वाटेकडे नेले आहे.
या कार्यक्रमास संस्थेचे सर्व संचालक, सल्लागार, व्यापारी, ग्राहक, सभासद, ठेवीदार,अधिकारी,कर्मचारी, हितचिंतक यांनी वर्धापन दिन समारंभास उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे उपमहाव्यवस्थापक हेमंत तुपे यांनी केले आहे.