Friday, June 20, 2025
HomeUncategorizedकोरोनाच्या लढाईतील ‘शिलेदारांना' चव्हाण कुंटुंबियांची साथ ; लता चव्हाण यांच्या उपक्रमाचे होतेय...

कोरोनाच्या लढाईतील ‘शिलेदारांना’ चव्हाण कुंटुंबियांची साथ ; लता चव्हाण यांच्या उपक्रमाचे होतेय सर्वच स्तरातून कौतूक ; आजमिती पर्यंत 1000 मास्कचे मोफत वाटप

 

परळी :- ( वार्ताहर) सातारा येथे मुळचा टेलरिंगचा व्यवसाय असणारे चव्हाण कुटुंबीय यांनी कोरोनाची धाहकता ओळखून तसेच बाजारपेठेतील न परवडणारे मास्कच्या किंमती पाहून गाव खेडय़ातील पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच तसेच कोराना लढाईतील अत्यावश्क सेवेतील शिलेदारांना मोफत मास्कचे वितरण करुन मदतीचा हात दिला आहे. लता चव्हाण व त्यांच्या कुटुंबियांनी ड्रेस शिवून राहिरलेल्या कपडय़ाचा वापर करुन तसेच नवीन कपडय़ांच्या सहाय्याने ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींना 1000 मास्कचे मोफत वाटप करण्यात आले आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे चव्हाण कुटुंबियांचे कौतुक होत आहे.
सामान्य कुटुंबातील माहेर परळी असलेल्या लता चव्हाण यांनी आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतू या उपक्रमास सुरुवात केली. विविध संस्थां बरोबरच विस्ताराधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक ग्रामपंचायती पर्यंत हे मास्कचे किट कसे पोहोचेल याची तजबीज केली. ह्या किट वर कोडींग असल्याने त्याच बरोबर हे मास्कचे किट खरच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांपर्यंत पोहोचत आहे का यासाठी या किटमध्ये एका चिठ्ठीवर व्हाटसऍप नंबर दिला आहे. त्यावर मास्क मिळाल्यानंतर फोटो अपलोड करण्यास सांगितला आहे. एकूणच काय सामाजिक कार्य करताना चव्हाण कुटुंबीयांनी घेतलेली काळची कौतुकास्पद आहे. आतापर्यंत परळी विभाग,जावला विभाग,माण खटाव विभागातील बहुतांश ग्रामपंचायतींना मोफत मास्कचे वाटप करण्यात आले आहे. असा समाजहिताच्या उपक्रमामुळे चव्हाण कुटुंबीयांवर कौतुकांचा वर्षाव होते आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular