तुषार भद्रे सातार्‍याचे सांस्कृतिक वैभव : नगराध्यक्षा माधवी कदम ; सातार्‍यामध्ये आर्ट फ्युझन फेस्टीव्हलचा उत्साहात शुभारंभ

सातारा : तुषार भद्रे हे केवळ सातारा जिल्ह्याचे नव्हे तर संपुर्णं राज्याला लाभलेले एक अष्टपेैलू व्यक्तिमत्व आहेत. आज पर्यंत या  क्षेत्राशी निगडीत त्यांनी आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. नाटक, सिनेमा, एकांकिका, लेखन निर्मिती करत नवे कलाकार घडवण्याचे कामही ते करत आहेत.सातारा शहराला ऐतिहासिक वारसा असताना भद्रे हे खरोखरच सातारचे सांस्कृतिक वैेभवच आहेत असे उदगार नगराध्यक्षा सौ.माधवी कदम यांनी काढले.  एसबीएन चॅनेलच्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त तुषार भद्रे स्कुल ऑफ थिएटर अँड फिल्म आर्ट च्या वतीने शाहू कालामंदिरात आर्ट फ्युझन फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले असून याचे उदघाटन प्रसंगी बोलताना नगराध्यक्षा माधवी कदम यांनी वरील उदगार काढले
यावेळी प्रांताधिकारी स्वाती देशमुख , श्रीकांत के टी, मधू फल्ले ,शशी गाडे , सागर गायकवाड,राजन कुंभार,श्री.तारु सर,अमित देशमुख दीपक देशमुख,राजू मुळ्ये , अतुल कुलकर्णी.आदी मान्यवर रंगकर्मी,चित्रकार उपस्थित होते.
प्रास्ताविक ज्येष्ठ रंगकर्मी व प्रशिक्षक तुषार भद्रे यांनी करताना  सातारचा सांस्कृतिक पर्यावरणाचा परिप्रेक्ष समृद्ध करणार्‍या या महोत्सवात परफॉर्मिंग आर्ट व फाईन आर्टचा संगम करण्यात आलेला आहे. हा सर्वस्वी नवा उपक्रम असून नाट्य-चित्र-शिल्प-साहित्य याचा एकत्रित असा आविष्कार सादर होतआहे. यापुढे अधिक कला आणि साहित्याची अंंगे व्यापक रुपात भविष्यात घेउन आपणा पुढे येउ यासाठी सर्व सातारकरांनी आजवर केले तसेच अजोड प्रेम कलेवर करावे .हा महोत्सव 5 जानेवारीपर्यत  दरम्यान शाहू कला मंदिर सातारा येथे संपन्न होत आहे. असे सांगितले.
या प्रसंगी बोलताना प्रांताधिकारी स्वाती देशमुख यांनी आशा महोत्सवामुळे सांस्कृतिक पर्यावरण समृध्द होण्यास निश्चितच मदत होते असे सांगून तुषार भद्रे रंगकर्मी घडवण्याचे जे काम करीत आहेत ते अत्यंत मोलाचे असून त्यांच्या कार्यास प्रशासन नक्कीच सहकार्य करेल आशा शब्दात गौरव केला.
ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप आंबेकर,बाळकृष्ण शिंदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन दीपक खांडके यांनी केले
उदघाटन सोहळ्यानंतर लोकरंगमंच, सातारा निर्मित तुषार भद्रे लिखित व रोहित ढेबे दिग्दर्शित लादेनच्या शोधात या नाटकाचा प्रयोग सादर झाला, तसेच आज  दिनांक 2 जानेवारी रोजी संध्याकाळी 4 वाजता पल्याड ग्रुप, सातारा निर्मित निमंत्रितांचे काव्य संमेलन व सायं. 7 वाजता संध्या रंगारी यांच्या कवितांचा नाट्याविष्कार संध्यारंग अर्थात कविता बाईच्या तसेच इरफान मुजावर लिखित नंगी आवाजे व ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट या कैलास भापकर व अजिम पटेल दिग्दर्शित 2 एकांकिका सादर करण्यात आल्या.
उद्या  दि. 3 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता कोल्हापूरचे शिल्पकार सत्यजीत निगवेकर अमित भिवदरर्णे आणि सातारचे संजय कुंभार शिल्पकलेची प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. सायं. 7 वाजता ए. बी. थिएटर कोल्हापूर निर्मित विल्यम शेक्सपियर यांची जागतिक अजोड कलाकृती 2 अंकी नाटक हॅम्लेट सादर होणार आहे.दिनांक 4 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता चित्रकार प्रा. सत्यजीत वरेकर-सांगली, जयकुमार वाला-पुणे आणि सागर गायकवाड-सातारा हे प्रोट्रेट, लॅण्डस्केप व क्रिएटिव्ह लॅण्डस्केप या चित्रकलेचे प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. त्याच बरोबरीने रंगभूषाकार कुमार भुरके, शशी आवळे व प्रशांत इंगवले हे रंगभूषा-वेशभूषा यांची प्रात्यक्षिके सादर करणार आहेत आणि सायं. 7 वाजता गायन समाज देवल क्लब निर्मित विद्यासागर अध्यापक लिखित-दिग्दर्शित ब्लॅक कॉमेडी नाटक दर्द-ए-डिस्को चा प्रयोग संपन्न होणार आहे.
दि. 5 रोजी दुपारी 3 वाजता ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. धैर्यशील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली युवकांच्या पुढील सामाजिक-सांस्कृतिक-आर्थिक व राजकीय आव्हाने या विषयावर परिसंवाद होणार असून यामधे युवक-युवती तसेच सर्व राजकीय पक्षांचे युवा अध्यक्ष यांचा सहभाग असणार आहे.
या महोत्सवाची सांगता रात्री 9 वाजता लोकरंगमंच सातारा निर्मित राजीव मुळ्ये लिखित दिग्दर्शित आणि झी अ‍ॅवॉर्ड व राज्यनाट्यस्पर्धा पारितोषिक विजेते नाटक बैल अ-बोलबाला च्या प्रयोगाने होणार आहे.  या संपूर्ण महोत्सवास प्रतिसाद देवून सातारकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन तुषार भद्रे, सागर गायकवाड, प्राचार्य विजय धुमाळ, राजीव मुळ्ये, राजन कुंभार यांनी केले आहे.