Saturday, June 21, 2025
Homeसातारा जिल्हापाटणपाटण शहरात दारू दुकानांसमोर पाचशे मीटर पर्यंत रांगा ; तळीरामांना कळाले...

पाटण शहरात दारू दुकानांसमोर पाचशे मीटर पर्यंत रांगा ; तळीरामांना कळाले सोशल डिस्टनसिंग महत्त्व ; मात्र बाजारपेठेत पुन्हा फज्जा

 

पाटण :- पाटण शहरात शिथिलता आली आसताना आज गर्दीचा उंचाक झाला. देशी दारू दुकान, वाईन शौप सुरु झाल्याने शौकीनांच्या लांबलचक रांगा लागल्या या रांगा दोन्ही बाजूने किमान पाचशे मीटर च्या अतंरा पर्यंत गेल्या होत्या. दारु विक्री मात्र सोशल डिस्टनसिंग मधे झाल्याची पाहायला मिळाले. दोन महिन्याच्या लौकडाऊन संचार बंदित पहिल्यांदाच पाटणची दारू दुकाने पोलिस बंदोबस्तात उघडल्याने शौकीनांची मात्र आज चंगळ उडताना दिसली. तर जुना बस स्टैंड वरील सातारा जिल्हा मध्यवर्ती बैंक, बाजार मार्केट येथील बैंक औफ महाराष्ट्र समोर सोशल डिस्टनसिंग  चा पुन्हा फज्जा उडाला. शहरातील मुख्य रस्ता व बाजारपेठत झालेल्या गर्दीवर नियंत्रण आणन्यासाठी पोलिस गाडीतून लोकांना वेळोवेळी आवाहन करण्यात येत होते. मात्र लोकांनी पोलिसांच्या आवाहनाला अल्प प्रतिसाद दिला.

कोरोना व्हायरस लौकडाऊन संचारबंदीत पाटणला थोडी शिथिलता आली आसताना पाटणची बाजार पेठ हळूहळू पुर्व पदावर येत आहे. मात्र बाजारपेठेत लोकांची होणारी गर्दी पाहून पाटण शहरात व आसपासच्या गावात कोरोना व्हायरस बाबत लोकांच्यात जनजागृती होणे गरजेचे आहे. कारण अजूनही अनेक बैंकासमोर, किराणा माल दुकान, भाजीपाला शेतकरी, व्यापारी विक्रत्याजवळ गर्दी होत आहे. या ठिकाणी कोणतेही सोशल  डिस्टनसिंग पाळले जात नाही. मात्र आज सुरू झालेल्या दारू दुकानासमोर सोशल  डिस्टनसिंग  चे स्अंतर ठेवून दोन्ही बाजुंनी पाचशे मीटर अंतरापर्यंत शौकीनांच्या रांगा लागल्या होत्या. यावरून पहिल्याच दिवशी दारुड्यांना सोशल डिस्टटनसिंग चे महत्व कळले.

मात्र बैंकेत, किराणा माल दुकानात व भाजीपाला खरेदीसाठी येणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना सोशल डिस्टनसिंग  चे महत्त्व अद्याप समजले नाही यातच सर्वांना आश्चर्य वाटलं आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular