कृष्णा मेडिकल कॉलेज येथे दाखल असणारे चार जण झाले कोरोना मुक्त ; आज सोडले घरी

सातारा दि. 13 ( जि. मा. का ):   कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणारे 4 कोरोना बाधित रुग्ण आज पूर्णपणे बरे झाले असून त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे.

 4 रुग्णांची   14 व 15 दिवसा नंतर पुन्हा चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये हे  4 कारोना बाधीत रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. या 4 जणांना आज घरी सोडण्यात आले.

या  4 जणांना कराड चॅरिटेबलचे  हॉस्पिटलचे डीन डॉ.ए.वाय. क्षीरसागर  यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी डॉक्टर्स, परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.

आत्तापर्यंत क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथून 8 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथून 27 व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 4 असे जिल्ह्यातील  एकूण 39 रुग्ण कारोना मुक्त  झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

00000