डेरवण युथ क्लब आयोजित राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत अभयसिंहराजे भोसले विद्यालय चतुर्थ

परळी : डेरवण येथे झालेल्या राज्यस्तरीय किशोर स्पर्धांमध्ये श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले विद्यालय सोनवडी गजवडी संघाने चतुर्थ क्रमांक पटकाविला. चषक व 7000 रु. रोख बक्षिस मिळविले. डेरवण येथे आयोजीत केलेल्या राज्यस्तरीय खो खो स्पर्धेत राज्यातील नामवंत संघांनी भाग घेतला होता.
सोनवडी गजवडी संघाने प्रथम ठाणे ब संघाचा पराभव केला. दुसर्‍या सामन्यात सांगली संघाचा पराभव करत संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुढील सामन्यात मंडनगड संघाचा पराभव करत संघाने सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. सेमीफायनल मध्ये विहंग ठाणे अ संघाकडुन 2 गुणांनी पराभव झाला. या सामन्यामध्ये एकुण 26 संघांनी भाग घेतला होता. प्रथमच सहभाग घेऊन पाहिल्या चार मध्ये पोहचलेल्या या संघाचे विशेष कौतुक सर्वांनी केले. या संघाच्या यशाबदल आमदार शिवेंदसिंहराजे भोसले, संस्थेचे अध्यक्ष व पंचायत समिती सदस्य अरविंद जाधव, सचिव, खजिनदार तसेच संस्थेचे सर्व संचालक, सोनवडी गजवडी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले. या यशस्वी खेळाडूना शशिकांत गाढवे सर, ज्ञानेश्वर जांभळे सर, चंद्रकांत धर्माधिकारी सर, प्रणित कदम, चेतन कदम, ओंकार कदम, अक्षय लोकरे, सिद्धेश विभुते, विपुल पानसरे यांनी मार्गदर्शन केले.
या वर्षी या संघाने विविध स्पर्धांमध्ये केलेल्या नेत्रदिपक यशाबद्दल दोन्ही गावातील व परिसरातील ग्रामस्थांकडुन कौतुक होत आहे. या संघाने यापुढेही असेल यश संपादन करावे यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.