फलटण : 6 डिसेंबर 1956 वेळ कशी ती हेरली दुष्ट काळाने भीमरायांची प्राण ज्योत ती चोरली या अभिवादन पर गाण्याने फलटण शहरासह तालुक्यातील विविध भागातून भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यात आले
फलटण शहरातून ग्रंथ दिंडी काढण्यात आली तर निंभोरे ता फलटण येथे असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या असलेल्या अस्थि कलशाचे हजारो भीम अनुयायी यांनी जय भीम चा जय घोष करीत 61 व्या महापरिनिर्वाण दिनी दर्शन घेतले काही वर्षांपूर्वी या ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि असल्याचे लोकांना कळल्याने या ठिकाणी गर्दी या दिनी होते
निंभोरे येथे सकाळी 9 वाजता भगवान गौतम बुद्ध व् भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन केल्या नंतर त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले. दरम्यान दुचाकी रॅलीद्वारे तालुक्याच्या विविध भागातुंन भीम सैनिक निंभोरे येथे दाखल झाले होते यावेळी बौद्ध उपासक आणि उपासिका आदि सफेद वस्त्रां मध्ये उपस्थित होते
यावेळी सिद्धार्थ भीम गायन पार्टी यांच्या वतीने भीम गितांचा कार्यक्रम पार पडला तर तरुण कार्यकर्ते यानी रक्तदान शिबिरात सहभाग दर्शवला तर काहिनीं मनोगते व्यक्त केली महापुरुषांच्या जीवन चरित्राचे पुस्तक स्टॉल लावण्यात आलि होती मोतीराम गायकवाड़ यानी स्वत काढलेली भगवान् बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची चित्रे मंडपात लावली होती ज्यांना चैत्य भुमि दादर याठिकानि जाता आले नाही त्यांनी निंभोरे हीच चैत्य भूमि समजून दर्शन घेतले सातारा जिल्ह्यासह पुणे सांगली कोल्हापुर सोलापूर आदि जिल्ह्यातील कार्यकर्ते अभिवादन कार्यक्रमात सहभागी झाले होते बी आर ए कला व् क्रीड़ा मंडळा तर्फ सुविधा पुरविण्यात आल्या. तर तालुक्यातील विविध आंबेडकरी संघटना यानी विशेष परिश्रम घेतले.