मायणी : खटाव माण तालुक्याची आर्थिक गंगोत्री असलेल्या मायणी अर्बन बँकेच्या चेअरमानपदी अपेक्षेप्रमाणे सुरेंद्र गुदगे यांची तर व्हा.चेअरमानपदी दिपकराव देशमुख यांची निवड झाली.
मायणी अर्बन बँकेच्या वडूज येथील इमारतीच्या सभागृहात चेअरमन, व्हा चेअरमानपदाच्या निवडणुकीसाठी सर्व संचालकांची बैठक झाली. यामध्ये चेअरमनपदासाठी सुरेंद्र गुदगे यांच्या नावाची सूचना सुरेश राऊत यांनी मांडली. त्यास मोहनराव पाटील यांनी अनुमोदन दिले.व्हा.चेअरमानपदासाठी दिपकराव देशमुख यांच्या नावाची सूचना पापाभाई नदाफ यांनी मांडली. त्यास डॉ संतोष जाधव यांनी अनुमोदन दिले . निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वडूुजच्या साहाय्यक निबंधक सौ. प्रीती काळे यांनी काम यांनी काम पहिले. या निवडीवेळी सुरेंद्र गुदगे,मोहनराव जाधव, सुरेश राऊत,बाळासाहेब पाटील , दिपकराव देशमुख, उदय थोरात,राजाराम लाखे , विनोद घाडगे,सोमनाथ येवले, युवराज बिटले,सुदर्शन मिठारे, भाऊसाहेब लादे, महादेव माळी, पापाभाई नदाफ, डॉ संतोष जाधव,सौ अंजली बाबर, सौ मनीषा कचरे,हे नवनिर्वाचितसंचालक उपस्थित होते.
चेअरमन निवडीनंतर बोलताना सुरेंद्र गुदगे म्हणाले,बँकेच्या विटा,कराड,उंब्रज,येथे नव्याने शाखा सुरु करून बँकेचे पुणे विभाग कार्यक्षेत्रात सक्षमीकरन केले जाईल. नजीकच्या काळात बँकेची एस एम एस बँकिंग सुरु करून वसुली प्रक्रिया प्रभावशाली राबवणार आहे, एनपीए प्रमाण शून्य टक्क्यावर आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. नवनिर्वाचित चेअरमन, व्हा चेअरमन यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार , आ.अजित पवार., विधानपरिषदेचे सभापती ना रामराजे निंबाळकर, खा. विजयसिह मोहिते पाटील, आमदार शशिकांत शिंदे, प्रभाकर घार्गे, मकरंद पाटील, शिवेंद्रराजे भोसले, बाळासाहेब पाटील, दिपक चव्हाण, गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी , प्रदीप विधाते, प्रा. अर्जुन खाडे, नंदकुमार मोरे,मानाजी घाडगे, अँड.शरदचंद्र भोसले, बाळासाहेब माने,बंडा गोडसे, अनिल गोडसे, सुकुमार शहा,शिवाशेठ शिंदे, नाथा दबडे, चंद्रकांत पवार, चंद्रकांत पाटील, आशोक घोरपडे, टी. आर.गारळे, सतीश घोरपडे, यांनी अभिनंदन केले