
सातारा : देशातील ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट (एआयओसीडी) या केमिस्ट व वितरकांच्या सर्वात मोठ्या कंपनीने औषधांच्या ऑनलाईन विक्रीला विरोध केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 1 हजार 700 रिटेलर तसेच 550 होलसेलर अशा सुमारे 2 हजार 250 औषध विक्रेत्यांनी शुक्रवार दि. 28 रोजी संप पुकारला होता त्याला जिल्ह्यात 100 टकके प्रतिसाद मिळाला . त्यामुळे जिल्ह्यातील सर्व मेडिकल्स बंद होती आपल्या सहकार्या समावेत मोर्चा काढून औषध निर्माण अधिकारी व जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले .
सातारा डिस्ट्रीक्ट केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे, केंद्र सरकारने ऑनलाईनऔषधाची विक्री करण्याचा दिलेला कोणताही आदेश किंवा ई मेल फार्मसीजना भारतात कोणत्याही स्वरुपात कार्य करण्याची दिलेली मुभा यांचा निषेध करण्यासाठी भारतातील सर्व केमिस्टने एक दिवसांचा बंद पुकारला आहे. एआयओसीडीएने अनेक गंभीर बाबी निदर्शनाास आणल्या आहेत. औषधाची ऑनलाईन विक्री केल्यास ग्राहकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होवू शकतात. एमटीपी किट्स, सिल्डेनफिल, टॅडलफिल, कोडेनसारखी गुंगी आणणारी औषधे डॉक्टरांचा सल्ला न घेता ऑनलाईनने विकण्यात आली आहेत. जुन्या किंवा बनावटी प्रिस्क्रिप्शनवरुनही औषधांची विक्री केली जात आहे. ऑनलाईन औषध विक्री करणार्या कंपन्या औषध कायदा कलम 18 (क) मधील तरतुदींचे उल्लंघन करत आहेत. ऑनलाईन औषध विक्रीला परवानगी देणारे प्रगत देश याबाबत विचार करत आहेत. स्वाईन फ्लूचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. तेयामुळे रुग्णांना वेळेत औषधे मिळावीत यासाठी औषध विक्री सुरु ठेवण्याचे आदेश औषध प्रशासनाने दिले होते. तसेचनियंत्रण कक्ष स्थापन केला असून औषध उपलब्ध न झाल्यास रुग्णांनी संपर्क साधावा असे आवाहन औषध निरीक्षक विजय नांगरे यांनी केले होतेे.