Thursday, December 5, 2024
Homeठळक घडामोडीसन 2018 चा सातारा भूषण पुरस्कार सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट , मालिका लेखक...

सन 2018 चा सातारा भूषण पुरस्कार सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट , मालिका लेखक प्रताप गंगावणे यांना जाहीर

सातारा : येथील रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट व सातारकर नागरिकातफें प्रतिवर्षी दिला जाणारा मानाचा ..सातारा भूषण पुरस्कार ..2018 सालासाठी गेली 25 वर्षे नाटक, चित्रपट व दूरदर्शन या तिन्ही माध्यमातून कसदार , प्रभावी लेखनाने आपली नाममुद्रा प्रस्थापित करणारे सुप्रसिध्द साहित्यिक प्रताप गंगावणे यांना जाहीर करण्यात आला आहें.
 सातारा जिर्ल्ह्ंयातील कोरेगाव तालुक्यातील सोनके या खेडेगावातील शेतकरी कुटुंबातील सैन्य दलात मेजर असूनही साहित्य प्रेमी असणारे मेजर जयसिंग गंगावणे हे त्यांचे वडील. लहानपणापासूनच असणारा लेखनाचा छंद प्रताप यांनी पुण्यात विद्यार्थी गृहात राहून खडतर परिस्थितीतअ‍ॅग्रिकल्चर कॉलेजमध्ये बी. एस. सी. अ‍ॅग्री. व पुढे एम. ए. करताना उत्तम जोपासला.पुरुषोत्तम करंडक चा मानाच्या स्पर्धेत त्यांनी लिहिलेल्या एकांकिकेत प्रथम क्रमांक मिळाला. त्यानंतर लेखन हेच करिअर करायचे ठरवून त्यांनी लिहिलेल्या .. बायको असून शेजारी.. ,सासूबाईचं असंच असतं.. या नाटकांनी दीड ते 2 हजार प्रयोगाने लोकप्रियतेचे  उच्चांक केले. नंतरची त्यांची नाटके ही उत्तम चालली.
 पुढे चित्रपट कथा, पटकथा व संवाद लेखनाकडे वळताना  त्यांनी 26 मराठी, लीडर हा हिंदी तर 2 भोजपुरी, एक कोंकणी व एक तेलगू चित्रपट लिहीले. पैज लग्नाची , तांबव्याचा विष्णू बाळा, सख्खा भाउ पक्का वैरी, बापू बिरु वाटेगावकर, हे त्यांचे चित्रपट खूपच गाजले. व अनेक राज्य पुरस्कार ही त्यांना मिळाले. या शिवाय 5 बालनाट्ये, अनेक श्रुतिका व नभोनाट्येही त्याच्या सिध्द हस्त लेखणीतुन उतरली आहेत. शिवाय 3 वर्षे त्यांनी .. पहिला माझा नंबर,, हे बाल नियतकालिक चालवले. तर 7वर्षे विविध दैनिकातुन ..सातारी जर्दा, फुलबाज्या, बारागावचे पाणी ..असे सलग दैंनदिन स्तंभलेखनही केले.
 आज ते दूरदर्शनवरील मालीका लेखक म्हणुन सर्वज्ञात आहेत ..कालाय तस्मै नम:, राजा शिवछत्रपती, बाजीराव मस्तानी, पेशवा बाजीराव व सध्या प्रचंड लोकप्रिय झालेली .. स्वराज्य रंक्षक संभाजी.. या मेगा सिरीयल खूप नावाजल्या जाउन  घराघरात पोहोचल्या. वीरशिवाजी ही 260 भागांची हिंदी सिरीयलही त्यांच्याच लेखणीतुन साकारली होती.
 त्यांना उत्न्ृष्ठ चित्रपट लेखन व नाट्य लेखनाचे राज्य व केंद्र सरकारचे अनेक पुरस्कारंाबरोबर म.टा. सन्मान, चित्रकर्मी, कलारंग, भाउ फक्कड, अहिल्याबाई गौरव अशा असंख्य पुरस्कारांनी आजपर्यत गौरवले गेलेआहे. प्रतिभा , प्रज्ञा, जिद्द व प्रयत्न यांच्या बळावर त्यांनी  केलेली वाटचाल अनेक युवक,साहित्यिक व रंगकर्मीर्ना प्रेरणादायी ठरणारी आहे.
 गोडबोले ट्रस्टतर्फे 1991 पासूॅन प्रविर्षी ज्ञान, विज्ञान, अर्थ,ं कला, क्रिडा, साहित्य, अध्यात्म, सामाजिक कायर्ं अशा कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग कामगिरी  करणार्‍या सातारा जिल्ह्यातील सुपुत्रास सातारा भुषण पुरस्काराने गौरविले जाते. पुरस्काराचे यंदा 28 वे वर्षं असून यापुर्वी तर्कंतीथर्ं लक्ष्मण शास्त्री जोशी, छोटा गंधर्व, प्रा. शिवाजीराव भोसले, ह. भ. प. बाबामहाराज सातारकर,डॉ. नीळकंठराव कल्याणी, शाहीर साबळे, शेतकरी संघटनेचे शरद जोशी, सविता प्रभुणे, डॉ.नरेंद्र दाभोलकर, धावपटू ललीता बाबर, अपर्णा रामतीर्थंकर आदी मान्यवरांना गौरविण्यात आले आहे.
 यावर्षी ज्येष्ठ संशोधक डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर, रंगकर्मी बाळकृष्ण शिंदे आणि ट्रस्टचे विश्‍वस्त अशोक ,डॉ अच्युत व उदयन गोडबाले यांच्या निवड समितीने ही निवड केली आहे. रुपये 25 हजार व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप असून तो लवकरच समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेअशी माहिती गोडबोले ट्रस्टचेअध्यक्ष आणि ज्येष्ठ करसल्लागार ,साहित्य्यिक,चित्रपटनिर्माते व सामाजिक कायर्ंकर्ते अरुण गोडबोले यांनी दिलीआहे.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular