Saturday, June 21, 2025
HomeUncategorizedम्हासुर्णे येथील अंगणवाडी शाळेत हळदीकुंकु कार्यक्रम

म्हासुर्णे येथील अंगणवाडी शाळेत हळदीकुंकु कार्यक्रम

म्हासुर्णे:( प्रतिनिधी तुषार माने) म्हासुर्णे ता.खटाव येथील (पवारवाडी) अंगणवाडी येथे हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित मकर संक्राती निमित्त आयोजित केला होता

महिलांच्या मोठ्या सणापैकी मकर सक्रांत हा सण असतो या सणाला सासरहुन माहेरीवासीण माहेर या सणाला मोठ्या संख्येने उपस्थित रहातात या सगळ्या महिलांना एकत्र एका ठिकाणी येण्यासाठी या हळदीकुंकवाचा कार्यक्रम अंगणवाडी पवारवाडी येथे आयोजित केला होता.या कार्यक्रमावेळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना व अंगणवाडी विद्यार्थ्यांना तिळगुळ वाटप महिलांनी केले व महिलांनी विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप करण्यात आले.जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या कडुन उपस्थित सर्व महिलांना पेन वाटप करण्यात आले.असा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मंगल माने मँडम,जरग गुरुजी,शारदा जाधव मँडम,निकम मँडम यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित महिलांनी यावेळी सांगितले की अशाच प्रकारे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करुन विद्यार्थ्यांना सुध्दा सणाचे महत्त्व समजेल अशा कार्यक्रमाचे आयोजन करावे म्हणजे सणांचा विसर पडत चालला आहे अशा कार्यक्रमामुळे पुन्हा सणांचे महत्त्व समजेल.यावेळी उपस्थित महिलांनी शाळेला आवश्यक अशा सर्व सोईसुविधांची विचारपुस केली.महिलांनी सुध्दा शाळेला मदत करण्याचे आश्वासन मुख्याध्यापिका माने मँडम यांना दिले.या कार्यक्रमावेळी परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular