सातारा दि. 31 (जि.मा.का.) :-सातारा जिलह्यामध्ये 31 ऑगस्टपर्यंत मोबाईल लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या मोबाईल लोकअदालतीचा पक्षकार, विधिज्ञ आणि सर्व वित्तीय संस्था, मोबाईल कंपन्या यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक जोशी यांनी केले आहे.
2 ऑगस्ट वाडाकुंभरोशी ता. महाबळेश्वर, चिंधवली ता. वाई येथे 5 ऑगस्ट, 7 ऑगस्ट रोजी खेड ता. खंडाळा, 9 ऑगस्ट रोजी साखरवाडी ता. फलटण, 13 ऑगस्ट रोजी आंधळी ता. माण, 19 ऑगस्ट रोजी सातेवाडी ता. खटाव, 21 ऑगस्ट रोजी कोरेगाव, 23 ऑगस्ट रोजी मल्हारपेठ ता. पाटण व 28 ऑगस्ट रोजी उंब्रज ता. कराड येथे मोबाईल अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
1 ऑगस्ट रोजी केंजळ ता. जावली, 3 रोजी दांडेघर ता. महाबळेश्वर, 6 ऑगस्ट रोजी शेंदुरजने ता. वाई, 8 ऑगस्ट रोजी खेड, 12 ऑगस्ट रोजी गिर्वी ता. फलटण, 14 ऑगस्ट शिंगणापूर ता. माण, 20 ऑगस्ट रोजी पुसेगाव ता. खटाव, 22 ऑगस्ट रोजी कोरेगाव, 26 ऑगस्ट रोजी मल्हारपेठ ता. पाटण व 31 ऑगस्ट रोजी खोडशी ता. कराड येथे जनजागृती साक्षरता शिबीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
0000
सातारा जिल्ह्यात मोबाईल लोकअदालतीचे आयोजन
RELATED ARTICLES