Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीआ. बाळासाहेब पाटील यांचे हस्ते होणार मुसांडवाडी, येथील चौकाचा नामकरण समारंभ

आ. बाळासाहेब पाटील यांचे हस्ते होणार मुसांडवाडी, येथील चौकाचा नामकरण समारंभ

कराडः आ.बाळासाहेब पाटील यांचे हस्ते व माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या अध्यक्षतेखाली मुसांडवाडी, ता.खटाव येथे गणीभाई चौकाचा नामकरण समारंभ गुरूवार दिनांक 3 जानेवारी 2019 रोजी सायं 5.00 वाजता संपन्न होणार आहे.
सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जि.प.समाजकल्याणचे सभापती शिवाजीराव सर्वगौड, पंचायत समिती खटाव सभापती सौ. कल्पनाताई मोरे, उपसभापती पंचायत समिती खटाव संतोष साळूंखे, पंचायत समिती सदस्या सौ रेखाताई घार्गे, माजी सभापती जि.प.समाजकल्याण मानसिंगराव (आप्पा) माळवे, माजी सभापती पंचायत समिती चंद्रकांत पाटील (दादा), माजी सभापती मार्केट कमिटी सी.एम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस महंमद आवटे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
तरी सदर कार्यक्रमास विभागातील विविध गावाचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य ग्रामपंचायत, तसेच विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन, सर्व संचालक, तसेच प्रमुख कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन मुसांडवाडी येथील ग्रामस्थांचेवतीने करण्यात आले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular