मुंबई : मुंबईचा कुस्तीपटू नरसिंग यादवच्या समर्थनार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत. उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने नरसिंग यादवची ऑलिम्पिकवारी हुकण्याची शक्यता आहे.
मात्र, नरसिंग यादवने हे त्याच्याविरुद्ध रचण्यात आलेले कटकारस्थान असल्याचा दावा केला आहे.
याप्रकरणी आता मुख्यमंत्र्यांनीही नरसिंग यादवला पाठिंबा दिला आहे. विधानसभेत आज विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मागणीला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी नरसिंग यादवला सरकारचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले की, नरसिंग यादवच्या उत्तेजक चाचणीचे प्रकरण संशयास्पद वाटत आहे. आमचा नरसिंग यादवला पूर्ण पाठिंबा आहे.
याप्रकरणी क्रीडामंत्र्यांना पत्र पाठविल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
नरसिंग यादवला आमचा पूर्ण पाठिंबा: मुख्यमंत्री
RELATED ARTICLES