सातारा : येथील श्री उत्तर चिदंबरम् नटराज मंदिर ट्रस्ट व कांची महास्वामी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक रक्तदिनाचे औचित्य साधून भव्य महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात 51 मान्यवरांनी रक्तथदान करुन या सामजिक उपक्रमाला पाठींबा दिला.
या रक्तदान शिबीराचे उद्घाटनासाठी दैनिक ग्रामोध्दारचे संपादक धनंजय उर्फ बापूसाहेब जाधव व सैनिक स्कूलचे रजिस्ट्रार रणजित नलवडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
नटराज मंदिर परिसरातील नटराज हॉलमध्ये या रक्तदान शिबीराची सुरवात नटराज पुजन व दिप प्रज्वलनाने झाली. सकाळी 8 ते 1 व सायंकाळी 4 ते 7 या वेळात आयोजित या शिबीरात सातारकर नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या सामाजिक उपक्रमात योगदान दिले.
यावेळी नटराज मंदिराचे व्यवस्थापकिय विश्वस्त रमेश शानभाग,विश्वर्स्ंत रणजीत सावेंत, मुकुंद मोघे,संकेत शानभघग, राहूल घायताडे , संजय कारंडे यांचेसह अनेकोंनी सहभाग घेतला.
नटराज मंदिराने केवळ धार्मीकतेलाच प्रोत्साहन ने दता सामाजीक बोधिलकीच्या नात्यातून सुरु केलेेले हे उपक्रम खरोखरच महत्वाचे व आदर्श असे आहेत असे उदगार यावेळी दै.ग्रामेाध्दारचे संपादक बापूसाहेब जाधव यांनी काढले. रणजीत नलावडे यांनी वैयक्तीक तसेच संस्थच्या माध्यामातून हवी ती मदत करण्यास आम्ही तयार आहाते असे सांगुन रक्तदानाचे महत्व सवघंना माहीतच आहे. या दानाचे पुण्य हे अवर्णनीय आहे असे सांगुन सर्व रक्तदात्यांना शुभेच्छा दिल्या.