सातारा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रम करून सातारा शहराच्यावतीने मा. राहुल पवार शहराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली साजरा करण्यात आला.
मनसेचे अध्यक्ष मराठी ह्रदय सम्राट, मराठी मनाचे मानबिंदू, राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा शहरामध्ये क्रांतीसिंह नाना पाटील रूग्णालयात मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांसह मनसेचे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य संदिप दादा मोझर यांनी रक्तदान केले. दुपारी 12.30 वा. रिमांडहोम येथील गरजू व अनाथ मुलांना शाळेचे गणवेश वाटप करण्यात आले. तसेच रिमांड होम येथे वृक्षारोपण करण्यात आले.
दुपारी 1.00 वा. क्रांतीसिंह नाना पाटील रूग्णालयातील रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मिष्टान्न भोजन मनसे सातारा शहराध्यक्ष राहुल पवार, संदीप दादा मोझर व असंख्य कार्यकर्ते यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
तसेच दुपारी 2 वा. जिल्हा परिषद मैदान येथून झाडे लावा. झाडे जगवा असा संदेश देणारी वृक्षसंवर्धन मोटर सायकल रॅली काढण्यात आली होती. ही रॅली जिल्हा परिषद मैदान मार्गे राजवाडा ते कर्मवीर भाऊराव पाटील पथ मार्गे पोवई नाका ते पुन्हा जिल्हा परिषद मैदान येथे संपन्न झाली.
यावेळी मनसे सातारा शहराध्यक्ष राहुल पवार, महिला ता. अध्यक्ष सौ अनिता जाधव शहरा उपाध्यक्ष सुहास रणदिवे, दिलीप सोडमिसे, अजर शेख शाखा अध्यक्ष, किरण जगदाळे, संतोष सासवडकर (आण्णश) वैभव वेळापुरे, कुणाल चव्हाण, संदिप चोरगे, अनिल सोडमिसे, सुजित जाधव, अक्षय धुमाळ, अनिकेत साळुंखे, अर्जुन जगताप, जगन्नाथ आवटे, विनोद रणदिवे, नौशाद बारसकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.