काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा आज पदग्रहण समारंभ

फलटण : सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचीत जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पदग्रहण समारंभ व जिल्हा काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा मंगळवार दि. 5 फेब्रुवारी 2019 ला दुपारी 1 वा. विविध मान्यवरांच्या उपस्थित संपन्न होत असल्याची माहीती जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकार्‍यांनी दिली.
सातारा जिल्हा म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे सातारा जिल्हा असे सुञ या पुर्वीच्या राजकारणामध्ये होते .सातारा जिल्ह्याने राज्याला आणि पर्यायाने देशाला दिशा देण्याचे काम केले आहे स्वातंत्र्यपुर्व काळापासुन सातारा जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहीलेला आहे.सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीची सुत्रे पक्षाने एका तरुण नेतृत्वाकडे दिली असून जिल्हा काँग्रेसमध्ये या निवडीने कार्यकर्त्यांनमध्ये एक उत्साह संचारला असुन पदग्रहणाच्या निमित्ताने जिल्ह्यात काँग्रेस अजुन बळकट करण्याच्या दृष्टीने या मेळाव्याचे आयोजन केले आहे.
या मेळाव्याला अखील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महाराष्ट्र सहप्रभारी सोनल पटेल, महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण, माजी गृहराज्यमंत्री आ. सतेज पाटील, आ.मोहनराव कदम, आ. विलासकाका उंडाळकर पाटील आ. आनंदराव पाटील, आ.जयकुमार गोरे, माजी आ. मदनदादा भोसले, सजंय बालगुडे निरिक्षक सातारा, तौफिक मुलाणी सह निरिक्षक, उदयसिंह पाटील उडांळकर, यांच्यासह, काँग्रेस पक्षाचे जि. प. सदस्य, पं. स. सदस्य, नगरसेवक, जिल्हा काँग्रेस, महीला काँग्रेस, युवक काँग्रेस, एन.एस.यु.आय, सर्व सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.