Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीकराड तालुक्यात पावसाच्या संततधार सरी

कराड तालुक्यात पावसाच्या संततधार सरी

कराड : तालुक्यात पावसाच्या सरीवर सरी कोसळत आहेत. तालुक्यातील ओढे, नाले, नदींची पात्रे भरून वाहु लागली आहेत. तालुक्यातील छोटे-मोठे पाझर तलाव भरून ओसंडले आहेत. सतत पडणार्‍या पावसाच्या सरींनी शहराबरोबर तालुक्यातील व्यापार पेठा मंदावल्या आहेत. कोयना धरणातुन पाणी सोडण्यात आल्याने कराड तालुक्यातील नदी पात्रालगतच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या 15 दिवसापासुन तालुक्यात पावसाच्या सरी सतत कमी- अधिक प्रमाणात कोसळत आहेत. वाढत्या पाण्यामुळे तालुक्यातील निचरा न होणार्‍या शेतांची तळी झाली आहेत अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले आहे. वडगाव हवेली गावाला पाण्याने वेढा दिला आहे. कृष्णा कॅनोल ते गजानन हौसिंग सोसायटी दरम्यानच्या रस्त्यावर पाणी आल्याने या रस्त्यावरील वाहतुकीस व्यत्यय निर्माण झाला आहे. कोयना- कृष्णा नदीपात्रातील पाण्यात वाढ झाली आहे. तालुक्यातील छोटे-मोठे पाझर तलाव भरून वाहु लागले आहेत. सततच्या पावसाचा परिणाम शहर व तालुक्यातील व्यापार पेठावर झाला आहे. वातावरणातील हवामान बदलामुळे साथीच्या आजारात भर पडली आहे. कराड तालुक्याला लावुन असलेल्या ढेबेवाडी परिसरातही पावसाच्या मुसळधार सरी पडत आहेत. या भागातील मराठवाडी, महिंद, काळगाव-सह इतर धरणे भरून वाहु लागली आहेत. तेथील डोंगर दर्‍यातील ओघळी, ओढयांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular