Friday, March 29, 2024
Homeठळक घडामोडीदगड कोसळल्यामुळे रेवंडे घाट ठप्प

दगड कोसळल्यामुळे रेवंडे घाट ठप्प

परळी : रेवंडे, (ता. सातारा ) घाटात आज सकाळी एक मोठा दगड रस्त्यावर येऊन कोसळला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली.
सातार्‍यातून बोगदामार्गे जाणारा रस्ता रेवंडे भागात जातो. अलिकडच्या काळात कोट्यवधी रुपयांच्या निधीतून इथे घाटरस्ता तयार करण्यात आला आहे. यंदा पश्चिम भागात झालेल्या संततधार पावसात वारंवार दरड
कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. अशात आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास रेवंडेतून सातार्‍याकडे जाणार्‍या मार्गावर असलेल्या सोनार खिंडीत एक मोठा दगड कोसळून रस्त्यावर आला. त्यामुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला.
त्यातून सातार्‍याकडे होणारे दळणवळण ठप्प झालेे. पंतप्रधान सडक योजनेतून अलिकडच्या काळात नव्याने झालेल्या या घाटरस्त्यामुळे रेवंडेसह वावदरे, बेंडवाडी येथील ग्रामस्थांची सोय झाली आहे. घाट बंद झाल्यामुळे येथील लोकांना 12 किलोमीटरचा वळसा घालून राजापुरी, बोरणे या मार्गे ठोसेघर रस्त्याने साता-याला जावे लागणार आहे. रस्ता बंद झाल्यामुळे या सर्वांना आता विविध समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular