भाजपमध्ये आता आमदार फोडा फोडीचा एक कलमी कार्यक्रम सुरू
सातारा (अतुल देशपांडे) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आगामी विधानसभेसाठी मुलाखती सुरू असून. दि.28 तारखेपर्यंत सर्व मुलाखती संपवायच्या आहेत. तर दुसर्या बाजूला भाजप-सेना सत्ताधार्यांचा इतर पक्षातील आमदार फोडा फोडीचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे अशी टीका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. यावेळी पक्षाचे निरीक्षक सुरेशराव घुले, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. बाळासाहेब पाटील, तेजस शिंदे, शफीक शेख, व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
विधानसभेच्या निवडणुकीत सर्व मित्र पक्षांना घेऊन राज्यात सत्ताधारी विरोधात निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. लोकशाहीमध्ये मॅजिक फिगर महत्वाची असते. महाराष्ट्रात 145 आमदार सत्तेसाठी हवे आहेत. ज्याची जास्त ताकत आहे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते व कार्यकर्ते याचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. असे स्पष्ट करून अजितदादा पवार पुढे म्हणाले, कर्नाटकमध्ये भाजपने घोडे बाजार सुरू केला आहे. सर्व जाती धर्मातील घटकाची निराशा केली असून. देशातील मान्यवरांनी पंतप्रधानांना पत्र पाठवून वस्तुस्थितीची जाणीव करून दिली आहे. माहितीच्या अधिकारात बदल केला जात आहे. हे भयानक असून ठराविक बातम्या दाबल्या जातात. सत्ताधारी मंडळी विरोधकांचे खच्चीकरण करीत आहेत. आयकर विभागाचे छापे टाकून विरोधकांना भीती दाखवली जात आहे. महाराष्ट्रात वंचित आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी व घटक पक्षाचे 18 खासदार निवडून येऊ शकले नाहीत. सध्या पक्षांतराची चर्चा जास्त असून. कोणी पक्ष सोडून गेले म्हणून पक्ष संपत नाही.1993 साली शिवसेनेचे 19 आमदार पक्ष सोडून गेले. तरी शिवसेना संपली नाही. याचा दाखल देत ते म्हणाले, पवार साहेबानी 55 आमदार निवडून आणले होते, त्यापैकी 5 आमदार त्यांच्या सोबत राहिले. तरी देखील नंतर त्यानी 65 आमदार निवडून आणले. पवार साहेबांनी राजकारणात अनेक चढ उतार पाहिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नव्या चेहर्यांना संधी देण्याची भूमिका विधानसभा निवडणुकीत घेतली आहे. समविचारी पक्षाने एकत्र आले पाहिजे. नगरपंचायत पालिका कर्मचार्यांना वेतन आयोग लागू केल्यामुळे 500 कोटी रुपये अतिरिक्त बोजा सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे. या पूर्वी राज्य सरकारने वेतन आयोग का लागू केला? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सध्या दुष्काळी परिस्थिती असून सह्याद्रीच्या परिसरात जुलै महिना अखेर सर्व धरणे भरली जात होती.स्वतंत्र दिनी धरणे ओसंडून वाहत होती.पण, आता अजूनही चारा छावण्या, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत. दुबार पेरणीचे नैसर्गिक संकट उभे राहिले आहे. अशावेळी राज्य सरकारने मोफत बी-बियाणे उपलब्ध करून दिली पाहिजे अशी मागणी अजित दादा पवार यांच्याकडून करण्यात आली
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सातारा जिल्ह्यातील फलटण, माण – खटाव मतदारसंघात प्रत्येकी सहा व इतर ठिकाणी एक व दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अजित पवार, राजेश टोपे, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अर्ज दाखल केले नाहीत याचा अर्थ ते राष्ट्रवादीत नाहीत असा होऊ शकत नाही असे एका प्रश्नाला उत्तर दिले.
त्यांनी अर्ज भरला नाही म्हणजे ते पक्षासोबत नाहीत, असा अर्थ काढू नका : अजित पवार
RELATED ARTICLES