सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र लवंगारे रा. कळंबे, ता. सातारा यांची कन्या चि. सौ. कां. शिवानी व सैदापूर येथील माजी उपसरपंच विलास जयसिंग पवार यांचे जेष्ठ चि. तुषार यांचा विवाह सोहळा गुरुवारी अनंतराज मल्टीपर्पज हॉल पुणे-बेंगलोर जुना हायवे राजदिपनगर कोंडवे येथे मोठ्या थाटात पार पडला. दरम्यान वधू-वरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी शुभेच्छा दिल्या.
या विवाह सोहळ्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आ. शशिकांत शिंदे, आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. बाळासाहेब पाटील, आ. आनंदराव पाटील, जि. प. अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष दिपक मानकर, जिल्हा सहकार बोर्डाचे धनंजय शेडगे, बाळासाहेब सोळस्कर, माजी कृषी सभापती किरण साबळे, पाटील, माजी सभापती धर्मराज घोरपडे, माजी शिक्षण सभापती सुनिल काटकर, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा सौ. समिंद्रा जाधव, अल्प संख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष शफीक शेख, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, सुधीर धुमाळ, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस गोरखनाथ नलवडे, प्रदेश संघटक बाळासाहेब महामुलकर, जिल्हा बँकेचे संचालक नितीन पाटील (काका), माजी जि. प. उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, अरविंद कदम, पारिजात दळवी, किरण ताटे, अजिंक्यतारा साखर कारखान्याचे संचालक सर्जेराव सावंत, सीमा जाधव, पं. स. सदस्य संजय पाटील, सैदापूरचे पोलीस पाटील दत्तात्रय पवार, उपसरपंच अमित पवार यांच्यासह राजकीय सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच कळंबे व सैदापूर येथील ग्रामस्थ वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते.
चि. सौ. कां. शिवानी व चि. तुषार यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत विवाह सोहळा थाटात
RELATED ARTICLES