महिमानगड येथे 12 मे रोजी महाश्रमदानाचे आयोजन

म्हसवड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले महिमानगड गाव दुष्काळाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी तेथील युवा वर्गाने कंबर कसली असून सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत झोकून दिले असून येत्या 12 मे या दिवशी महाश्रमदान आयोजित केले असून आपण सगळ्यांनी यात सामील व्हावे असे आवाहन महिमानगड ग्रामस्थांनी केले आहे.
ऐतिहासिक वारसा लाभलेलं महिमानगड गाव भौगोलिक दृष्ट्या पाहिलं तर गावाच्या चारी बाजूने डोंगराळ प्रदेश पाहिलं तिकडे उंच टेकड्या त्यावर वाळलेल गवत आणि याच्या मध्यभागी गाव गावात खडकाळ जमीन सर्व गावाला पावसाच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागते उन्हाळ्यात तर खूप गंभीर परिस्थिती उदभवते अनेक वेळा टँकर वेळेवर न येण्याने पाणी उपलब्ध होत नाही.गावाच्या पिण्याच्या पाणी प्रश्न सुटावा म्हणून महिमानगड प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कार्यन्वित झाली मात्र ती अल्पावधीतच बंद झाली मग काय पुन्हा पाण्यासाठी धावपळ पळापळी ग्रामस्थांना करावी लागते.अनेक पिढ्या गेल्या या गावचा सहभाग कोणत्याही पाणी योजनेत नाही म्हणुन या गावाचा पाणी प्रश्न सुटला नाही.वार्षिक पावसाच्या आशेवर हे गाव अवलंबून असते.पाऊस पडून तरी पाणी साठून राहण्यासाठी ना बंधारे ना तलाव मग पाणी तरी कशा मध्ये साठणार यातच सत्यमेव जयते कार्यक्रम पाहून या गावातील युवा वर्गाने गावात या बद्दल सगळ्यांना माहिती देत मोठ्या प्रमाणात जनजागृती करत काम करण्याचा निर्धार केला.
गावाचा माथा ते पायथा काम करण्याचे ठरले व बघता बघता सगळा गाव श्रमदानाला हजर होऊ लागला गावाच्या वाघजाई डोंगरावर सुमारे 25 हेक्टर काम मशीनच्याया साहायाने पूर्ण झाले किल्ल्यावर बानेश्वर मंदिरा जवळ गावकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात श्रमदान करून लूज बोर्डर,डीप सी सी नालाबांध, बांध बंधीस्ती अशी कामे पूर्ण केली आहेत.डोंगरावर व डोंगराच्या सभोवताली छोटे नालाबांध व त्याला उत्तम असे पिचिंग करण्यात आले आहे आता येत्या 12 मे रोजी आम्ही महा श्रमदान कामासाठी व्यस्त असून या कामासाठी आमच्या गावातील सर्व लेकी जावई पै पाहुणे याना आम्ही बोलवलं असून तालुक्यातील सर्व लोकांनी आमच्या या उपक्रमात सहभागी होण्याचे आम्ही आवाहन करत आहे आपल्या सहभागी होण्याने आमचा आत्मविश्वास वाढणार असून आपल्या हाताच्या ताकतीच्या जोरावर दुष्काळाशी आपण सामना करू शकतो.