सातारा : दिनांक 12 ते 22 डिसेंबर या कालावधीत पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा येथे श्री सेवागीरी महाराज यात्रा संपन्न होत आहे. या यात्रेचा मुख्य दिवस दि. 17 डिसेंबर हा असुन या दिवशी श्री सेवागिरी महाराज यांच्या रथाच्या मिरवणुकीचा कार्यक्रम पार पडत असतो. त्यामुळे येथे वाहनांची गर्दी होवुन वाहतुक व्यवस्थेत अडथळा निर्माण होणार आहे. याकरीता संदीप पाटील, पोलीस अधिक्षक सातारा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 33 (1)(ब) नुसार पुसेगावातील व परिसरातील रस्त्यावरील वाहतूकी संबंधिचा आदेश दि. 16 डिसेंबर रोजीच्या सकाळी 7 ते दि. 17 डिसेंबर रोजीच्या मध्यरात्रीचे 24 वाजेपर्यंतच्या कालावधीकरीता जारी केले आहेत.
यानुसार सातारा बाजुकडून दहिवडी बाजुकडे जाणारी वाहने पुसेगाव गावात न जाता नेर, राजापुर, कुळकजाई मार्गे दहिवडीकडे जातील व दहिवडी बाजुकडुन येणारी वाहने कटगुण, खटाव, खातगुण, जाखणगाव मार्गे औंध फाट्याकडे विसापूरमार्गे साताराकडे जातील. वडुज बाजुकडून ते फलटण बाजुकडे जाणारी वाहने पुसेगाव गावात न येता खटाव, जाखणगाव, औंध फाटा ते नेर ललगुण मार्गे फलटणला जातील. तसेच फलटण बाजुकडुन वडुज बाजुकडे जाणारी वाहने नेर, ललगुण, औंध फाटा, जाखणगाव, खटाव किंवा चौकीचा आंबा मार्गे वडुजकडे जातंील. दहिवडी ते डिस्कळ जाणारी वाहतुक निढळ, मलवडी, राजापुर मार्गे जातील.
प्रवेश बंद व नो पार्कींग – वडुज रोडवरील राजे ढाब्याकडुन शिवाजी चौकाकडे जाण्याकरीता राज्य परिवहन बसेस वगळून सर्व वाहनांना बंदी घालण्यात येत आहे. तसेच सदर रोडवर दुतर्फा सर्व वाहनांसाठी नो पार्कींग झोन करण्यात येत आहे. तसेच वडुज रोडवरील सेवागिरी विद्यालयाकडे जाण्याकरीता सर्व वाहनांना बंदी घालण्यात येत आहे. विसापुर फाट्याकडून शिवाजी चौकाकडे जाण्याकरीता सर्व वाहनांना प्रवेश करण्यास बंदी घालण्यात येत आहे. तसेच रोडवर दोन्ही बाजुंनी सर्व वाहनांना नो पार्कींग झोन करण्यात येत आहे. शिवराज मंगल कार्यालयाकडुन शिवाजी चौकाकडे येणा-या सर्व वाहनांना प्रवेश करण्यास बंदी घालण्यात येत आहे