आरे तर्फ परळी येथे गरजु कुंटुंबियांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप

मेढा ( वार्ताहर ) – कोरोना या महामारी मध्ये आरे तर्फ परळी येथे गरजू कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले.
प्रेरणा चॅरीटेबल ट्रस्ट आरे यांच्या वतीने कै. सुरेखा (लक्ष्मी ) मोहन गुरव ( माई ) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून आरे तर्फ परळी येथिल गरजु ५० कुटुंबियांना जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले. सध्या कोरोना संकमणामुळे लॉक डाऊन सारखी गंभीर परिस्थीती निर्माण झाली असून याचा विपरीत परिणाम नागरीकांचा जीवनमानावर होत असून सामान्य नागरीक अक्षरक्ष मेटाकुटीला आला आहे. आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या विचारातूनच या ट्रस्टने या लॉक डाऊन काळात केलेले कार्य उल्लेखनिय आहे.
या जीवनावश्यक किटचे वाटप प्रेरणा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सचिन गुरव, उपाध्यक्ष इक्बाल काझी, सचिव तातोबा भिसे, अन्य विश्वस्त यांनी केले. यावेळी तंटामुक्ती समितीचे अथ्यक्ष संदिप महाडिक, जितेंद्र गुरव, लक्ष्मण भिसे, महेश देशमुख आणि ग्रामस्थ , तसेच गरजु कुटंबिय उपस्थित होते. या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले असून नजिकच्या काळात प्रेरणा चॅरिटेबल ट्रस्ट अनेक उपयोगी उपक्रम राबविणार असल्याची माहिती अध्यक्ष गुरव यांनी दिली.