कराड : कोपर्डे ता कराड येथील ग्रामस्थांना वारंवार कृष्णा नदी पात्रात मगरीचे दर्शन होत आहे त्यामुळे गावच्या पानवटयावर जाणार्या महिला व ग्रामस्थांत भितीचे वातावरण पसरले आहे तेव्हा सबंधित विभागाच्या अधिकार्यांना याकामी त्वरीत लक्ष घालावे अशी मागणी ग्रामस्थांतुन होत आहे
गेल्या अनेक दिवसापासून कोपर्डे हवेली येथील नदी पात्रालगतच पांढर या शिवारात मगरीचा वावर आहे काही दिवसापूर्वी गावातील काही शेतकर्यांना कृष्णा नदी पात्रात मगरीचे दर्शन झाले होेते. ती मगर स्मशानभुमी नजीक असणार्या पाणवठयावर येत असल्याची ग्रामस्थांची शंका आहे गावातील स्मशानभुमी जवळच्या पाणवठयावर सतत नागरीकांची वर्दळ असते याच पाणवठयावर गावातील नागरीक अंघोळीसाठी जनावरांना पाणी पाजण्यासाठी जातात गावातील महिलांचा धुणे धुण्यासाठी तेथे वावर असतो याच दरम्यान नदी पात्रा लगत असणार्या तुळसी वृंदावणात मगर दिसुन येते.दुपारी 12 च्या सुमारास दर्शन घडते असे ग्रामस्थ सांगत आहेत.
कोपर्डे हवेलीत मगरीचे दर्शन : ग्रामस्थ भयभयीत
RELATED ARTICLES