पोलीस उप निरीक्षक शहाजी गोसावी यांना विशेष सेवा पदक जाहीर

म्हसवड : येथील पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक श्री शहाजी चंद्रकांत गोसावी यांना यांना मा पोलीस महासंचालक यांचे कडून गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागात 2 वर्षा पेक्षा जास्त केलेल्या अतिशय खडतर व कठीण सेवेसाठी विशेष सेवा पदक जाहीर केले आहे.
15 मार्च 2015 रोजी गडचिरोली येथे हजर. हजर झाल्यानंतर शस्र हाताळणी, नक्सल व्यूहरचना, गडचिरोली पोलीसांची कार्यपद्धती व इतर महत्वाचे कार्य विषयक 1 महिन्याचे अतिशय खडतर असे र्क्षीपसश्रश ींरलींळलरश्र अँड ीर्शीींर्ळींरश्र र्लेीीलश चे प्रशिक्षण पूर्ण केले ,त्यानंतर तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील सर यांचे आदेशाने नक्सल विरोधी मोहीम व आदिवासी जनतेचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र व तेलंगणा सीमे वरील अतिशय नक्सल ग्रस्त भागातील व्यंकटापूर येथे त्यांची नेमणूक करण्यात आली.. व्यंकटापूर येथे हजर झालेनंतर आदिवासी जनतेला शासनाच्या विविध योजनांची माहिती करून दिली .लोकशाही विषयी त्यांच्या मनात चांगली भावना निर्माण करून योग्य प्रवाहकडे जाण्यास मार्गदर्शन केले.
स्वतः कृषी विषयक शिक्षण घेतले असल्याने स्थानिक जनतेला जनजागरण मेळावे घेऊन व स्वतः त्यांचे शेतीत जाऊन पालेभाज्या ची लागवड,कापूस,तूर, टोमॅटो,हिरवी मिरची लागवड या बाबत योग्य मार्गदर्शन करून कमीत कमी पाण्यात कशा पद्धतीने पीके घेतली जातात या बाबत प्रोत्साहित केले आणि अवलमारी, कर्णेली, लंकाचेन,व्यंकटापूर ही गावे हरीत बनवण्यास मदत केली.तालुक्याला जाण्या
येण्यासाठी चांगला रस्ता नसल्याने स्थानिक सुमारे500 ते 600 लोक एकत्र जमवून अवलमारी ते कोत्तगुडम हा 11 ज्ञा चा रस्ता श्रमदानातून तयार केला तसेच अतिशय डोंगराळ भागात असलेल्या आंबेझरा या गावात मोटार सायकल पण जाण्यासाठी रस्ता नव्हता त्या ठिकाणी जाण्यासाठी सुमारे 7 ज्ञा चा रस्ता श्रमदानातून तयार केला तसेच आंबेझरा गावातील सर्व लोकांना कपडे वाटप करून माणुसकी दाखवली.
पोलीस ठाणे हद्दीतील सर्व तरुण मुलांना एकत्र करून खेळांचे सामने भरवून त्यांना योग्य बक्षीस वितरण करून त्यांच्या मनात पोलीस प्रशासन व शासना विषयी चांगली भावना व शिक्षणाची आवड निर्माण करण्याचे काम केले.लंकाचेन व अवलमारी येथील दोन गरीब लोकांना स्वतः चे पगारातून आर्थिक मदत करून किराणा दुकान तसेच हॉटेल चालू करून दिले.सर्वात महत्वाची यशस्वी गोष्ट म्हणजे व्यंकटापूर येथील संपूर्ण कार्य काळात पोलीस ठाणे हद्दीतून एकही व्यक्ती नक्सल गोटात भरती होऊ दिली नाही आणि एकही हिंसक घटना घडू दिली नाही.
या सर्व कार्यात झीळ योगेश पाटील,िीळ अनिकेत हिवरकर, झीळ संतोष मुपडे,िीळ राजेंद्र पवार,झीळ शेखर शेटे या सर्वांचेच समान व महत्वाचे कार्य आहे.4 ऑगस्ट रोजी कोल्हापूर परिक्षेत्र येथे बदली झालेने खॠ ऑफिस येथे हजर होऊन खॠ साहेबांचे आदेशाने सातारा जिल्ह्यात हजर होऊन सध्या म्हसवड येथे कार्यरत आहे.
शहाजी गोसावी यांना पुरस्कार जाहीर होताच सातारा जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते ,डी वाय एस पी अनिल वडनेरे ,म्हसवड पोलीस ठाण्याचे स पो नि मालोजीराव देशमुख ,म्हसवड पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचारी,सर्व पोलीस पाटील तसेच अनेक मान्यवर यांनी शहाजी गोसावी यांचे अभिनंदन केले.